Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»आरोग्य»धानोऱ्यातील रुग्णवाहिका सेवा ‘व्हेंटिलेटर’वर!
    आरोग्य

    धानोऱ्यातील रुग्णवाहिका सेवा ‘व्हेंटिलेटर’वर!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 20, 2026Updated:February 20, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    धानोरा, ता. चोपडा

    परिसरातील रुग्णाच्या सुविधेसाठी शासनाने 102 रचग्णवाहिकेची सेवा हाती घेतली असली तरी ही सेवा पूर्णत: कोमात गेल्याने रुग्णांना तारेवरची करसत करावी लागत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून रुग्णवाहिकेची बॅटरी नादुरुस्त झाली असून पेोलसाठी निधी नसल्याने रुग्णवाहिका सेवा ठप्प झाली आहे. या बाबत स्थानिक अधिकाऱ्यांपासून जिल्हा पातळीवरील अधिकारी एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करण्यातच वेळ खर्ची घालत आहे. प्रसूती झालेल्या महिलांना ही रुग्णवाहिका एक आशेचा किरण ठरत होती. मात्र सेवाच ठप्प झाल्याने प्रसूत महिलांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

    चोपडा तालुक्यातील धानोरा येथे 102 रुग्णवाहिका सेवा अक्षरशः ‘व्हेंटिलेटर’वर गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शासनाने ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने सुरू केलेली ही सेवा सध्या स्वतःच उपचारांच्या प्रतीक्षेत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रुग्णवाहिकेची बॅटरी निकामी झाली असून इंधनासाठी निधी उपलब्ध नसल्याने वाहन जागच्या जागी उभे आहे. परिणामी, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. विशेषतः प्रसूती झालेल्या महिलांसाठी ही सेवा ‘जीवनदायिनी’ ठरत होती; मात्र आता त्यांनाच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

    स्थानिक पातळीवर विचारणा केली असता अधिकारी निधीअभावी हात टेकल्याचे सांगतात, तर जिल्हा पातळीवरील संबंधित विभागाकडून प्रस्ताव प्रलंबित असल्याचे कारण पुढे केले जाते. दरम्यान, दोन्ही स्तरांवरील यंत्रणा जबाबदारी झटकत एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करण्यात व्यस्त आहेत. परिसरात अनेक कुटुंबांकडे तातडीने वाहन भाड्याने घेण्याइतकी आर्थिक क्षमता नाही. रात्रीच्या वेळी अचानक प्रकृती बिघडल्यास रुग्णांना चारचाकी मिळवणेही कठीण जाते. काही नागरिकांनी तर रुग्णवाहिका आहे, पण चालत नाही; सेवा आहे, पण मिळत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. आरोग्य सेवा ही मूलभूत हक्कांपैकी एक मानली जाते. अशा परिस्थितीत केवळ बॅटरी व इंधनअभावी सेवा ठप्प होणे हे प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे द्योतक मानले जात आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने निधी उपलब्ध करून रुग्णवाहिका सेवा पूर्ववत सुरू करावी, अन्यथा एखादी गंभीर घटना घडल्यानंतर जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. धानोऱ्यातील ही ‘कोमात गेलेली’ रुग्णवाहिका पुन्हा रस्त्यावर धावेल का? की कागदोपत्रीच उपचार सुरू राहतील, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तापमानाने ओलांडली चाळीशी!

    March 10, 2026

    पोलिस कॉन्स्टेबलने संपविले जीवन!

    March 9, 2026

    भारनियमनामुळे बळीराजा हतबल!

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.