Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आयटी कंपनीतील हिंदू मुलींचे धर्मांतर करून मानसिक छळ!
    • रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!
    • जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!
    • नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला
    • तोल जावुन पडल्याने प्लबींग कारागिराचा मृत्यू
    • जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीची चकाकी वाढली
    • शूद्रातिशूद्रांना हक्काची जाणीव करुन देणारे : ‘क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले’!
    • हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»एआयमध्ये अंबानी करणार 10 लाख कोटींची गुंतवणूक
    राष्ट्रीय

    एआयमध्ये अंबानी करणार 10 लाख कोटींची गुंतवणूक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 19, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    भारत एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मुकेश अंबानी यांनी घोषणा केली आहे की, रिलायन्स जिओने देशात डेटा स्वस्त केला आहे. युझर्ससाठी कमी किंमतीत तो उपलब्ध करुन दिला आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेतही, एआयची तंत्रज्ञान सुद्धा स्वस्तात भारतीयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता भाड्याने, किरायाने घेऊ शकत नाही. जिओ देशात इंटरनेट युगानंतर इंटेलिजन्स इरा आणणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. मुकेश अंबानी हे एआयमध्ये 10 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहेत. यावेळी मुकेश अंबानी यांनी Jio AI ची वैशिष्यही सांगितले.

    मुकेश अंबानी म्हणाले की जिओ AI, भारतीय भाषांमध्ये काम करेल. त्यामुळे शेतकरी, तरुण, विद्यार्थी आणि छोट्या व्यावसायिक हे त्यांच्या भाषेत एआयचा वापर करू शकतील. ही गोष्ट लक्षात ठेवत कंपनीने शिक्षण क्षेत्रासाठी शिक्षण AI, आरोग्य AI, कृषी क्षेत्रासाठी आणि सर्वसामान्यासाठी भारत IQ सारखे प्लॅटफॉर्म बाजारात आणेल. हे प्लॅटफॉर्म स्थानिक भाषांमध्ये AI बेस्‍ड सॉल्‍यून्शस उपलब्ध करुन देतील.

    मुकेश अंबानी यांनी सांगितले की, कंपनी जामनगरमध्ये टप्प्याटप्प्याने मल्टि गीगावॅट AI-रेडी डेटा सेंटर पार्क विकसीत करेल. 2026 च्या अखेरपर्यंत 120 मेगावॅट क्षमतेसह हा प्रकल्प सुरू होईल. त्यामुळे गीगावॅट अधिक व्यापक होईल. विशेष म्हणजे हा प्रकल्प अक्षय ऊर्जेवर, Green Energy वर सुरू असेल. यामुळे देशभरात जलदगतीने एआयवर अनेक काम करणे सोपे होईल. शाळा, दुकानं, रुग्णालयं आणि कृषी क्षेत्रासाठी विशेष सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल.

    मुकेश अंबानी यांनी विश्वास व्यक्त केला की, भारत 21 व्या शतकात AI शक्ती केंद्र असेल. त्यासाठी एआयची सुविधा सुकर आणि जलदगतीने आणि सहज वापरण्याजोगी हवी असे मत त्यांनी मांडले. कंपनी आता एआयमध्ये मोठी मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. हे तंत्रज्ञान सहज आणि उच्च दर्जाचे असावे यासाठी रिलायन्स जिओ पायाभूत सुविधेसह मोठा प्रकल्प उभारणार आहे.

    India AI Impact Summit 2026 मध्ये मोठी घोषणा

    रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि उद्योपती मुकेश अंबानी यांनी India AI Impact Summit 2026 मध्ये मोठी घोषणा केली. जिओ आणि रिलायन्स इंडस्ट्रीज मिळून येत्या 7 वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तर ही काही सट्टेबाजी नाही तर भारताच्या एआय भविष्यासाठीची मोठी गुंतवणूक असल्याचे म्हटले आहे.

    AI India India AI Impact Summit 2026 Investments Jio AI Mukesh Ambani Reliance
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा

    April 10, 2026

    मतदान सुरु होण्याआधीच  काँग्रेसला मोठा धक्का

    April 9, 2026

    युद्धविरामाने कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण?

    April 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.