लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासनाच्यावतीने व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळा तर्फे घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षांच्या जाहीर झालेल्या निकालात जळगांव रेल्वे स्टेशन जवळील अभिनव टेक्निकल इन्स्टिट्युट प्रशिक्षण संस्थेचा हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर (आरोग्य स्वच्छता निरीक्षक)अभ्यासक्रमाचा ९८ टक्के निकाल लागलेला आहे. सर्व विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण होऊन उत्तुंग भरारी घेऊन नेत्रदीपक यश संपादन केलेले आहेत.
ॲनाटाॅमी, फिजिओलॉजी, कम्युनिटी पब्लिक हेल्थ व न्यूट्रेशन, कॅरेक्टर सायन्स संप्रेषन, पर्यावरण स्वच्छता इ. विषयी नविन शैक्षणिक धोरण एन. ई. पी. नुसार दर्जेदार प्रशिक्षण देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. स्वच्छता निरीक्षक हे पद सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अभिनव इन्स्टिट्युटचे विद्यार्थी या क्षेत्रात उत्तम कामगिरी करतील. प्रथम क्रमांकाने ऋषिकेश विजयकुमार चौधरी (९४.७१%), द्वितीय क्रमांक श्रुती राजेश नारखेडे (९४.५७%), तृतीय क्रमांकाने मनोज शालिकराम सोनवणे (९३.८६%), चतुर्थ क्रमांकाने धनराज भानुदास मराठी (९३.७१%), पाचव्या क्रमांकाने धनराज सुपडू कानडे (९३.००%) आणि अमिर रशीद शेख हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सर्व विद्यार्थ्यांनी फर्स्ट क्लास डिस्टींक्शन मध्ये विशेष प्राविण्यासह ५५विद्यार्थी घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचे आणि संस्थेच्या संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे यश संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या पुरावा आहे. आणि पुढील काळातही संस्था असेच उत्कृष्ट कार्य करीत राहील. असा विश्वास संस्थेचे संस्थापक प्रा. पी आर पाटील यांनी व्यक्त केला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. पी आर पाटील, प्राचार्य निखिल पाटील, प्राध्यापक विवेकानंद सारडे, प्राध्यापक विनायक काळे, मनोज ओतारी, संगिता जैन, संचालिका पुष्पा पाटील यांनी अभिनंदन केले.


