अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या १८ प्रभागासाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली असून यात १८ महिला व १८ पुरूष उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यात अनुसूचित जातीसाठी २ महिला व १ सर्वसाधारण तसेच अनुसूचित जमातीसाठी १ महिला व १ सर्वसाधारण आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
आरक्षण सोडतची बैठक नगर परिषदेच्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात दुपारी ३ वाजता प्रशासक व प्रांताधिकारी सीमा अहिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर हिमांशू मोरे (वय ६) व अजमलखान पठाण (वय ८) या चिमुकल्यांच्या हस्ते आरक्षण सोडतीच्या चिठ्य्या काढण्यात आल्या.
प्रभागनिहाय सोडत खालीलप्रमाणे आहे..
प्रभाग- १
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग- २
अ- अनुसूचित जाती महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग- ३
अ- अनुसूचित जमाती महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग- ४
अ- अनुसूचित जाती सर्वसाधारण
ब- सर्वसाधारण
प्रभाग- ५
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग- ६
अ- अनुसूचित जाती महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग- ७
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग- ८
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग- ९
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग- १०
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग- ११
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग- १२
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग- १३
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग- १४
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग- १५
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग- १६
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग- १७
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग- १८
अ- अनुसूचित जमाती सर्वसाधारण
ब- सर्वसाधारण महिला
या आरक्षणावर हरकती स्विकारण्याची शेवटची मुदत २१ जुन असणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाने जाहीर केले आहे. सोडत काढतेवेळी आजी माजी नगरसेवकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.