मोबाईल हॅक करून एक लाखात फसवणुक

0

अमळनेर, लोकशाह न्यूज नेटवर्क 

आजकाल फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.  अमळनेर शहरातील एकाचा मोबाईल हॅक करून एक लाख रुपयात गंडवल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  फिर्यादी भावेश गणेश पाठक (रा. बाहेरपूरा) यांचे बँकेत युनियन बँकेच्या अकाउंटमधून ७ जानेवारी रोजी दुपारी ४ ते ७ वाजेच्या सुमारास मोबाईल हॅक झाल्याने दुसरा अज्ञात एक हॅक करून मोबाईल मधील डेटावर लक्ष ठेऊन डेटा वापरत होता.

दरम्यान त्याने एक लाख रुपये एका नंबर वर ट्रान्सफर झाले. त्यानंतर दचकलेल्या पाठक यांनी बँकेत जाऊन बँकेला सूचना दिली. मोबाईल हॅक झाल्याची माहिती दिली. अमळनेर पोलिसांत याबाबत फिर्याद दिली. त्यावरून अमळनेर पोलिसात सायबर ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.