घरासमोरील अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणावर गुन्हा दाखल

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

अमळनेर तालुक्यातील शिरूड येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शिरुड येथील तरुणाने घरासमोर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना २६ एप्रिल रोजी १ वाजेपूर्वी घडली. आईवडिल शेतातून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूड येथील ११ वीच्या वर्गात शिकणारी १७ वर्षीय मुलगी तिचे आईवडील कामाला गेल्यानंतर घरातून बेपत्ता झाली. तिची आई दुपारी १ वाजेच्या सुमारास शेतातून घरी परतल्यानंतर मुलगी घरात आढळून आली नाही. त्यानंतर तिचा आजूबाजूला नातेवाईकांकडे विचारपूस केल्यानंतरही तपास लागला नाही. त्यानंतर गल्लीतील लोकांनी सांगितले की, घरासमोर असलेला जगदीश पितांबर पाटील हा तरुण देखील गायब असून त्यानेच मुलीला पळवून नेले आहे.

दरम्यान मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून जगदीश पितांबर पाटील या तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास हेडकॉन्स्टेबल जनार्दन पाटील करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here