अमळनेरमध्ये एमआयडीसीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू

0

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात एका तरुणाचा संशयास्पद स्थितीत आढळला आला आहे. तुषार चौधरी (रा. प्रताप मिल कंपाऊंड, अमळनेर) असे मयत तरुणाचे नाव असून तो अमळनेर तालुक्यातील मारवड येथील मूळ राहणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत तुषार चौधरी हा ५ रोजी रात्री बाहेर गेलेला होता. तो रात्री उशिरापर्यंत परत आला नव्हता. परंतु आज सकाळी मंगरूळ येथील एमआयडीसीमध्ये तो मयत अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावर मार लागलेला दिसून येत होते. तसेच आजूबाजूला दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या. त्यामुळे तुषार सोबत घातपात झाला आहे का?, याचा तपास पोलीस करीत आहेत.

पोलीस पाटील भागवत पाटील यांनी पोलिसांना कळवताच पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक बागुल, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.