अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
अमळनेर तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच अंत झालाय. भरधाव चाकचाकी वाहनाची प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक बसली. या धडकेत रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि तरुणाचा मृत्यू झाला. भटू पाटील (भटू बाबा) असं मृत तरुणाचं नाव आहे.
अमळनेर तालुक्यातील मंगरुळ एमआयडीसीजवळ आज सकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा जागीच चक्काचूर झाला. हृदयद्रावक बाब म्हणजे भटू पाटील याचा तीन दिवसांपूर्वीच वाढदिवस होता. त्याच्या मित्रपरिवाराने त्याचा वाढदिवस खूप जल्लोषात साजरा केला होता.
त्यातच आणखी दुर्देवी म्हणजे भटूने अडीच महिन्यापूर्वीच प्रेमविवाह केला होता. मात्र नियतीला काही औरच मान्य होतं. आई-बापाला आपल्या लेकाची आणि बायकोला आपल्या नवऱ्याची बातमी कळल्यानंतर त्यांनी एकच टाहो फोडला. तरुण तडफदार लेक गेल्यानं सर्वत्र नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.