Tuesday, November 29, 2022

धक्कादायक.. पोटच्या मुलांची विक्री; माता पोलिसांच्या ताब्यात

- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

आपल्या पोटच्या मुलांची विक्री करतांना आईला ताब्यात घेतल्याची घटना अमळनेर येथे घडली. अमळनेर पोलिसांच्या सतर्कतेने त्या बालकांना बालसुधारगृहात सोडण्यात आले.

- Advertisement -

- Advertisement -

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरात गांधलीपुरा भागातील सुभाष चौकात एक महिला काही मुलांना विक्री करत असल्याचे समजले. अधिक तपासासाठी पो. कॉ. नाजिमा पिंजारी, दिपक माळी,रविंद्र पाटील यांचे पथक सदर महिलेचा शोध घेत तिला गाठले.  माहिती घेवून तिचे जवळील ७ मुलासह पोलीस स्टेशनला हजर केले.

यावेळी स्वतः हिराबाई देवा गायकवाड (वय ४०, रा. बेघर फिरस्ते), सोबत ०३ मुली व ०४ मुले यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले. सदर महिलेच्या ताब्यातील मुलाबाबात अधिकची विचारपुस करुन चौकशी केली असता असे निष्पन्न झाले की, सदर मुले व मुली त्या महिलेचे अपत्य असून तिचा पती कोरोना काळात आजाराने मयत झाल्याने तिच्याकडे मुलांसाठी उपजिविकेसाठी पुरेसे साधन नसल्याने ती तिच्या मुलांना इच्छुक लोकांना विक्री करत होती.

बेकायदेशीरपणे मुलांना विकणे चुकीचे असून महिलेला समज देण्यात आली.  तसेच भविष्यात पुन्हा मुलांना विकून टाकण्याची शक्यता असल्याने तिच्या ताब्यातील ०३ मुली व ०४ मुले व तिचे पालन पोषण करण्याकरिता सदर बालकाची काळजी घेण्यासाठी व त्या बालकांना संरक्षण मिळण्यासाठी त्यांना बाल कल्याण समिती जळगाव येथे हजर करून महिला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले.

सदरच्या कारवाई वेळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउपनि नरसिंग वाघ, पो.कॉ. नाजिमा पिंजारी, दिपक माळी, रविंद्र पाटील उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या