Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»लोणखुर्दजवळ नवजात अर्भक आढळल्याने खळबळ
    गुन्हे वार्ता

    लोणखुर्दजवळ नवजात अर्भक आढळल्याने खळबळ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 13, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोणखुर्दजवळ नवजात अर्भक आढळल्याने खळबळ
    उघड्यावर फेकून दिल्याने उपचारापूर्वीच मृत्यू; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

    अमळनेर : तालुक्यातील लोणखुर्द गावाजवळ माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. ११ डिसेंबर) दुपारी उघडकीस आली. लोणखुर्द–मूडी रस्त्यावरील एका बंद घराजवळ अज्ञात व्यक्तीने नवजात मानवी अर्भक निर्दयपणे उघड्यावर फेकून दिल्याचे समोर आले असून, गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या या अर्भकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.

    लोणखुर्द येथील पोलीस पाटील उदय निंबाजी पाटील यांनी या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुरुवारी दुपारी सुमारे ३.४५ वाजता ते शेतात काम करत असताना गावातील एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीला फोन करून कैलास भगवान पाटील यांच्या बंद घरालगत जखमी अवस्थेत नवजात अर्भक पडल्याची माहिती दिली. ही बातमी समजताच पाटील दाम्पत्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

    घटनास्थळी पाहणी केली असता ते मानवी नवजात अर्भक असल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक बाब म्हणजे अर्भकाच्या पोटाचे लचके तुटलेले असल्याने त्याचे लिंग ओळखता येत नव्हते. हा भयावह प्रकार पाहून त्यांनी तात्काळ मारवड पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेच्या सहाय्याने अर्भकाला ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर अर्भकाला मयत घोषित केले.

    कोणीतरी अज्ञात, निर्दयी व्यक्तीने नवजात अर्भकाला रस्त्यावर फेकून देत अमानुष कृत्य केल्याची प्राथमिक खात्री झाल्यानंतर पोलीस पाटील उदय पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही, वैद्यकीय नोंदी व अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif