Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»अमळनेरमध्ये काँग्रेससह शरद पवार गटाला धक्का
    जळगाव जिल्हा

    अमळनेरमध्ये काँग्रेससह शरद पवार गटाला धक्का

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 14, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

     

    अमळनेर मतदारसंघातून दोन वेळा काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवलेले डॉ. अनिल शिंदे यांच्यासोबत अमळनेर तालुक्यातील सरपंच, माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील माजी नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, माजी शहराध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्षांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

    प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी खासदार स्मिता वाघ, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, जळगाव पश्चिमचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राध्येश्याम चौधरी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. प्रवेश केलेल्या सर्वांचा पक्षात यथोचित सन्मान राखला जाईल अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली. डॉ. अनिल शिंदे यांच्यासोबत काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये नीळकंठ पाटील, गांधली चे सरपंच नरेंद्र पाटील, पातोंडा व कंडारी चे माजी सरपंच सुनील पवार आणि डॉ. पुरुषोत्तम सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष इलेक्टोपॅथी डॉक्टर संघटना डॉ. हिंमत सूर्यवंशी, माजी ग्रामपंचायत सदस्य (पाडळसरे) रणछोड पाटील. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगरसेवक व शहराध्यक्ष श्याम पाटील, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दयाराम पाटील, राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय चव्हाण,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दर्पण वाघ, युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष कुणाल चौधरी, जळगाव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे, संभाजी पाटील, सुमित पाटील, संभाजी ब्रिगेडचे संदीप पाटील आदींचा समावेश होता.

    #amalner #bjp Congress Sharad Pawar group
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif