हमाल कामगाराची मुले झाली अधिकारी

एकाचवेळी भाऊ बहिण महाराष्ट्र लोकसेवा आयोगातुन अधिकारी

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील ताडेपुरा येथील कंखरे कुटुंबात एकाच घरातील भाऊ, बहीण एमपीएससीतून अधिकारी झाले. वडीलांनी हमाली करून मुलांना अधिकारी बनवल्याने सर्वत्र स्वागत केले जात आहे. ताडेपुरा येथील भगवान देवचंद कंखरे यांनी हातमजुरी,हमाली करून आशा बिकट परिस्थितीतून आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह केले.

परिस्थिती बेताची होती, परंतु आशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी ओळखले. त्याप्रमाणे मुलांना घडवले. रोहित कंखरे व शुभांगी कंखरे दोघेही भाऊ बहीण एकाच वेळी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेत. शुभांगी कंखरे या परीक्षेत राज्यात 18 व्या क्रमांकावर आहे म्हणून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

धनगर समाज बांधवांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी भाजपाचे उपाध्यक्ष चंद्रकांत कंखरे, नवी मुंबई येथील एपीआय सुनील कंखरे, धनराज कंखरे, धनराज नाटू चिंचोरे, आसाराम देवचंद कंखरे, श्रावण दयाराम धनगर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.