वकील संघाच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी ॲड .दीपेन परमार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील तालुका वकील संघाच्या तालुकाध्यक्षपदी ॲड दीपेन परमार यांची तर उपाध्यक्ष व सचिव यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड के व्ही कुलकर्णी यांनी काम पाहिले.
उपाध्यक्षपदी ॲड. अमजदखान पठाण ,सचिवपदी ॲड राकेश बिऱ्हाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा वकील संघातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष ॲड आर डी कच्छवा , माजी उपाध्यक्ष व्ही एन चौधरी ,ॲड राजेंद्र चौधरी , ॲड शकील काझी , ॲड आर व्ही निकम, ॲड बाविस्कर , ॲड शशिकांत पाटील ,ॲड कुंदन साळुंखे , ॲड राकेश पाटील हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.