Monday, November 28, 2022

झोक्याचा फास लागून मुलाचा दुर्देवी मृत्यू

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

अमळनेर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शहरातील मुंदडा नगर भागात राहणाऱ्या एका पंधरा वर्षीय मुलगा झोका खेळत असताना त्याच्या गळ्याला झोक्याचा फास लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

वेदांत संदीप पाटील (वय १५ ) हा मुलगा रविवारी आपल्या घरी झोका खेळत अभ्यास करत होता. यावेळी झोका गरगर फिरून त्याची मान त्यात अडकली. यात त्याचा मृत्यू झाला.

मयत झालेला वेदात संदीप पाटील हा इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असल्याची माहिती मिळाली आहे. वेदांतचे आई वडील शिक्षक आहे. ३ महिन्यापूर्वी सोनी मराठी या मराठी वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या कोण होणार मराठी करोडपती यामध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. त्या शिक्षिका जयश्री पाटील यांचा तो मुलगा आहे.

दरम्यान वेदांतचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या