Wednesday, February 1, 2023

धावत्या ट्रेनमध्येच प्रसूती; अमळनेर रेल्वे पोलिसांचं माणुसकी दर्शन

- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

धावत्या रेल्वेत एका प्रवासी महिलेला प्रसूती वेदना सुरु होवून रेल्वेच्या डब्यातच महिलेची प्रसूती झाली. यावेळी अमळनेर रेल्वे पोलिसांसह महिला प्रवाशांनी माणुसकीचे दर्शन घडवत सुपरफास्ट रेल्वे ३१ मिनिटे थांबवून तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.

क्रांतीदेवी सुनील महतो (वय 28, रा.विशपुरसोंसा, जि. समस्तीपूर बिहार) असे या महिलेचे नाव असून ती आपल्या तीन मुलींसोबत सुरतवरून बिहारकडे जायला निघाली होती. सदर महिला आठ महिन्यांची गर्भवती होती. प्रवासात या महिलेला प्रसव कळा होत असल्याची माहिती प्रवाशांनी अमळनेर रेल्वे पोलिसांना दिली. दरम्यान माहिती मिळताच आरपीएफचे कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्परतेने धाव घेत रेल्वे डॉक्टर व रुग्णवाहिकेला माहिती दिली. यावेळी त्या रेल्वे डब्यात असलेल्या महिलांना आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी  प्रसूतीसाठी आवाहन केले. त्यानुसार उपस्थित महिलांनी सदर महिला प्रवाशाची प्रसूती केली.

- Advertisement -

यावेळी रेल्वेच्या डॉक्टरांच्या उपस्थितीत महिला आणि बाळावर प्राथमिक उपचार करून रुग्णवाहिकेने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल अमळनेर येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले. नवजात बाळ आणि आईची प्रकृती सामान्य आहे. याबाबत सदर महिलेच्या पतीशी संपर्क साधून माहिती देण्यात आली आहे.

एएसआय जयपाल सिंग, सीटी  दिनेश मांडळकर, डॉ. किरण बडगुजर यांच्या टीमच्या तत्परतेने महिला आणि तिचे बाळ सुखरूप आहे. त्यांच्या या स्तुत्य कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे