Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»गांधली येथील बेपत्ता तरुणीचा विहिरीत मृतदेह आढळला
    गुन्हे वार्ता

    गांधली येथील बेपत्ता तरुणीचा विहिरीत मृतदेह आढळला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 13, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गांधली येथील बेपत्ता तरुणीचा विहिरीत मृतदेह आढळला

    अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील गांधली येथून १० तारखेला बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह १२ तारखेला (शुक्रवारी) गावालगतच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    गांधली येथील जयश्री संजय संदानशिव (वय १८) ही बारावीचे शिक्षण घेणारी तरुणी १० तारखेला दुपारी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. सायंकाळपर्यंत ती परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक व परिचितांकडे शोधमोहीम राबवली; मात्र तिचा काहीही पत्ता लागला नव्हता.

    दरम्यान, १२ तारखेला दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास जयश्रीच्या वडिलांना गांधली येथील सुनील पाटील यांचा दूरध्वनी आला. त्यांनी गावातीलच धनंजय कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत एका मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती दिली. मृतदेहावर काळ्या रंगाची ओढणी दिसत असल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता विहिरीतील मृतदेह जयश्रीचाच असल्याची दुर्दैवी खात्री झाली.

    घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मयत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या खबरीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार गणेश पाटील करीत आहेत.

    #amalner Suicide
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif