पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
शिक्षण घेणारे गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांना कोणत्याही मदतीला आपण सदैव तयार आहोत, त्यांनी फक्त शिक्षण घ्यावे कोणतीही चिंता करू नये असे प्रतिपादन भडगाव पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी एका सत्कार समारंभात मध्ये व्यक्त केले. गोराडखेडा उर्दू केंद्र व शिक्षक सेना पाचोरा उर्दू विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने दहावी बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ नवीन उर्दू हायस्कूल व जूनियर कॉलेज येथे घेण्यात आला. ह्या कार्यक्रमामध्ये आ. किशोर पाटील बोलत होते.
पवित्र कुराणचे पठण व नाते पाखणे कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमचे उद्दिष्ट शेख कदिर यांनी मांडले. शेख जावेद रहीम यांनी मान्यवरांच्या परिचय व त्यांची कामगिरी व्यक्त केली. उर्दू माध्यमातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या साठी एवढा मोठा कार्यक्रमास मी पहिल्यांदाच हजेरी लावली आहे. महाराष्ट्र शासनाची योजना लाडकी बहन याचा फायदा मुस्लिम विद्यार्थिनींना होणार. मुस्लिम अल्पसंख्यांक असो की कोणतेही धर्म जातीच्या असो मी सदैव त्यांच्याशैक्षणिक मदतीला उभा आहे असे प्रतिपादन आ. किशोर पाटील यांनी केले.
या वेळी समुपदेशन होऊन नवीन आलेल्या शिक्षकांचाही गटशिक्षणाधिकारी पाचोरा पंचायत समिती समाधान पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. आ. किशोर पाटील यांनी उर्दू शाळा साठी केलेल्या पाठपुरावातून पाचोरा तालुक्यात पाच नवीन शिक्षक मिळाले. आनंदीत पालकांनी यावेळी ह्या सहकार्य बद्दल आ. पाटील यांचा सत्कार व कौतुक करण्यात आले. यावेळी पाचोरा तालुक्यात बदल घडणारे व उत्कृष्ट कामगिरी करणारे शिक्षक शेख जावेद रहीम व शेख कदिर शब्बीर यांचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रम मध्ये पाचोरा शहर, भडगाव शहर, नगरदेवळा, कुऱ्हाड, लासगाव, शेंदुर्णी, पिंपळगाव हरेश्वर गावातून विद्यार्थी व पालकांनी सहभाग घेतला. गुणवंत साठ विद्यार्थ्यांना आ. किशोर पाटील यांनी प्रत्येकी पाचशे रुपये व हजार रूपयांची बक्षीस दिली. जावेद रहीम यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
आ. किशोर पाटील यांनी केलेल्या विदयार्थांच्या यथोचित सत्कारामूळे समस्त शिक्षक, पालक आणि विद्यार्थी समुदायाने आनंद व्यक्त केला.