Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»कथित संभाषण क्लिपने राजकीय भूकंप!
    ताज्या बातम्या

    कथित संभाषण क्लिपने राजकीय भूकंप!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 30, 2026Updated:July 30, 2026No Comments649 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भाजपाचे विजय चौधरींची मंत्री खडसेंबद्दल शिवराळ भाषा : राज्यात संतापाची लाट

    जळगाव | राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच भाजपामधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. नंदुरबारमध्ये भाजपाच्या विजय चौधरी या पदाधिकाऱ्याने पक्षातीलच माजी खासदारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा वाद शांत झालेला नसतानाच, आता आणखी एका कथित संभाषणाची क्लिप समोर आली आहे. या नव्या ध्वनिफितीमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले असून विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका सुरू केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर चौधरी यांनी अतिशय पातळी सोडून संभाषण केले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चौधरी यांचे हे संभाषण झाले असून सोशल मीडियावर हे संभाषण व्हायरल झाले आहे.
    मंत्री गिरीश महाजन आणि भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. थेट भाजपाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्याबद्दल या ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आली. हेच नाही तर वारंवार विजय चौधरी यांच्याकडून वादग्रस्त विधाने करण्यात आली. विजय चौधरी हे वारंवार रक्षा खडसे यांच्याबद्दल धक्कादायक भाष्य करत आहे. रक्षा खडसे, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे एकाच घरात राहत असल्याचेही ते वारंवार म्हणताना दिसत आहेत.
    यापूर्वी व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने पक्षातील माजी खासदारांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणानंतर संबंधित पदाधिकाऱ्याने पक्षाच्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. तसेच या प्रकरणी नंदुरबार येथे गुन्हाही दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून भाजपावर निशाणा साधत पक्षाच्या अंतर्गत कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या वादावरून राज्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली आहे. अशातच आता भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन आणि नंदुरबारमधील कथित ध्वनिफित प्रकरणात गुन्हा दाखल झालेले भाजप नेते विजय चौधरी यांच्यातील कथित दूरध्वनी संभाषणाची आणखी एक ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कथित संभाषणात चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव खडसे यांच्याविषयी शिवराळ आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करत असल्याचे ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे.
    याच कथित संभाषणात चौधरी यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा राजीनामा पक्षाने घ्यावा, अशा आशयाचे वक्तव्य केल्याचाही दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, या संभाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी चौधरी यांना थांबवण्याचा किंवा आक्षेप नोंदवण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकू येत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. उलट चौधरी यांच्या बोलण्याला अप्रत्यक्षपणे महाजन यांच्याकडून प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. मात्र, या कथित ध्वनिफितीच्या सत्यतेबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

    ‌‘‌‘ मी माझ्या वकिलांचा सल्ला घेत असून या प्रकरणात लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे, भाजपामधील संस्कृती लयाला गेल्याचे यावरुन स्पष्ट होते. पूर्वी भाजपमध्ये सुसंस्कृत नेते होते. महिला सशक्तीकरणाचा नारा देणाऱ्या भाजपाने अशा पदाधिकाऱ्यावर त्वरीत कारवाई करावी, मी कायदेशीपणे लढा देणार असून लवकरच या संदर्भात फिर्याद देखील देण्यात येईल.

    – एकनाथ खडसे,
    आमदार, राष्ट्रवादी (शप)

     

    ‌‘‌‘गटाराचे झाकण उघडल्यावर घाण ओसंडून वाहते तशी घाणेरडी भाषा या संभाषणातून बाहेर पडत आहे. भाजपात काम करणाऱ्या माझ्या महिला भगिनींनी सावध राहावे. कारण मुखात प्रभू श्रीरामांचे नाव घेऊन रावणाची वृत्ती असलेल्या लोकांसोबत तुम्ही काम करत आहात.

    – ॲड. रोहिणी खडसे,
    महिला प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी (शप)

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif