भुकेचा सारा खेळ; एकदा खा हेलीकॉप्टर भेळ… (व्हिडीओ)

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

गेल्या वर्षी व्हायरल झालेला “फ्लाइंग डोसा” सर्वांना ठाऊक असेलच. त्याच पद्धतीने अनेक रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विक्री करणारे, काही ना काही शक्कल लढवून आपला पदार्थ लोकांपर्यंत कसा जास्तीत जास्त पोहोचेल याचा प्रयोग करत असतात. त्याच प्रकारे आता अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक असाच विक्रेता अनोख्या पद्धतीने भेळ बनवताना दिसून येत आहे. लोकांनी त्याला हेलीकॉप्टर भेळ असे नाव देत सोशल मिडीयावर व्हार्ल केल आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपणही पाहु शकता. की रो व्यक्ती जलद वेगाने कशी भेळ तयार करत आहे.

https://www.instagram.com/reel/Cg18O3nIBkE/?utm_source=ig_web_copy_link

त्याची भेळ बनवण्याची गती पाहून अनेकजण चकित झाले. भेळपुरी हा भारतातील एक लोकप्रिय नाश्ता/स्नॅक पदार्थ आहे. ज्यामध्ये शेंगदाणे, बटाटे, कांदा, टोमॅटो आणि मसालेदार चटण्या एकत्र करून हलका पण स्वादिष्ट पदार्थ बनवला जातो. सहसा, सर्व घटक एका भांड्यात घेतले जातात आणि सर्व्ह करण्यापूर्वी एकत्र मिसळले जातात. मात्र, हा भेळपुरीवाला फार वेगात भेळमधील घटक मिक्सिंग करत आहे. त्याच्या या गतीमुळे लोक हेलिकॉप्टर भेळ म्हणू लागलेत. आणखी काही मिनिटे अशीच गती राहिली असती तर भेळमधून वीज निर्माण झाली असती, असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.