Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे!
    ताज्या बातम्या

    आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 27, 2026No Comments101 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मान्सूनपूर्व तयारी : जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आदेश
    जळगाव
    जून महिन्यात सुरु होणाऱ्या मान्सून काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव तसेच जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आगामी मान्सूनपूर्व व मान्सून काळात विविध पातळीवर करावयाची पूर्वतयारी आणि विभागनिहाय उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
    यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यात संभाव्य अतिवृष्टी, पूरस्थिती, वीजपुरवठा खंडित होणे, रस्ते वाहतूक अडथळे, पाणी साचणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध विभागांनी करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या सूचना दिल्या.
    गाव व शहर पातळीवर पाणी साचणाऱ्या ठिकाणांची ओळख करून आवश्यक उपाययोजना करण्यासह नियंत्रण कक्ष चौवीस तास कार्यरत ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित यंत्रणांनी रस्ते, पूल व नाल्यांची तातडीने पाहणी करून दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. महावितरण विभागाने वीजवाहिन्यांलगत धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करून अखंडित वीजपुरवठ्यासाठी आवश्यक तयारी ठेवावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. आरोग्य विभागाने साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी औषधसाठा, आरोग्य पथके व रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात, तर महसूल, पोलीस, परिवहन, कृषी, दूरसंचार व इतर विभागांनी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला. नदी, नाले व धरण परिसरातील नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना देण्याबाबतही संबंधित विभागांना निर्देशित करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनात समन्वय, तत्परता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif