Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»रक्षा खडसेंच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी सर्वपक्षीय मोर्चा
    संपादकीय

    रक्षा खडसेंच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी सर्वपक्षीय मोर्चा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 6, 2026No Comments244 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व खडसे परिवाराच्या संदर्भात नंदुरबारचे विजय चौधरी यांनी टेलिफोनवरून जे अर्वाच्य संभाषण केले आहे, त्यांच्या निषेधार्थ आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात मुक्ताईनगर व रावेर येथे सर्वपक्षीय तसेच सर्व जाती-धर्मांच्या समाजातर्फे विजय चौधरी यांच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात आले.

    लोकशाहीमध्ये कुणालाही व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असले तरी त्याला काही मर्यादा असतात. महिलेविषयी आपण काय बोलतो आहोत, याचे भान राखले पाहिजे. ते भान विजय चौधरी यांनी राखलेले नाही. रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे यांच्या विरोधात अश्लील भाषेचा त्यांनी अक्षरशः कळस केला. त्या विजय वसंत चौधरी यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन मुक्ताईनगर आणि रावेर येथे सर्वपक्षीय मेळाव्यातून देण्यात आले.

    तातडीने ही कारवाई प्रशासनाने करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात आला. यापूर्वी नंदुरबार येथेही सर्वपक्षीय तसेच लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने मोर्चा निघाला होता. नंदुरबार येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, तर मुक्ताईनगर आणि रावेर येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. विजय चौधरी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी असे मोर्चे निघण्याचा सिलसिला सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!

    September 13, 2026

    एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले

    September 11, 2026

    महामार्ग बायपासची दशा : बायपास भरावासाठी तीन महिने!

    September 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif