मुंबई : एकनाथ शिंदे यांचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे. त्याच्याशी भाजपचा काही संबंध नाही. या बंडाचा सरकारवर काय परिणाम होईल हे आत्ताच सांगता येत नाही. पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जर काही प्रस्ताव आला तर भाजप स्वीकारेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचे मंत्रीही एकनाथ शिंदेंसोबत! संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई बंडात सामील
राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणूकीतही भाजपची रणनीती यशस्वी ठरली आहे. याचा सर्वात मोठा धक्का महाविकास आघाडीला बसला आहे. यामध्ये आणखी एक धक्का म्हणजे विधान परिषद निकालानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे २९ आमदारांसह अज्ञातवासात आहेत. त्यामुळे आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री शिंदे यांना जणू ऑफरच दिली आहे.
पाटील म्हणाले की, शिवसेना आमदारांमध्ये आधीपासूनच अस्वस्थता होती. आमदारांची काम होत नसल्यामुळे असलेली नाराजी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत समोर आली आहे. या नाराजीतूनच एकनाथ शिंदे यांनी बंड केले असावे. पण या बंडाशी भाजपचा काही संबंध नाही. पण शिंदे यांच्याकडून जर कोणता प्रस्ताव आला तर भाजप स्वीकारेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post