Wednesday, February 1, 2023

राणादा-पाठकबाई अडकले विवाह बंधनात

- Advertisement -

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून (Tuzyat Jiv Rangala Serial) घराघरांत पोहचलेले राणादा आणि पाठकबाई अर्थातच अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आज विवाह बंधनात अडकले आहेत. पुण्यामध्ये दोघांचा विवाहसोहळा संपन्न होतोय. सकाळी त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली असून दोघांनी सप्तपदी घेतल्या आहेत.

मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रमानंतर विवाह सोहळ्यात देखील हार्दिक आणि अक्षय अतिशय सुंदर दिसत आहेत. या सोहळ्याचे बरेच व्हिडीओ व फोटो व्हायरल झालेत. त्यानंतर आता स्वतः अक्षयानेच एक खास पोस्ट शेअर केली आहे.

- Advertisement -

या फोटोला अक्षयाने “रील ते रिअल. जादू कायम” असे कॅप्शन देताना म्हटले आहे. त्याबरोबर तिने #अहा असा हॅशटॅग शेअर करत हार्ट इमोजी शेअर केला आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे