Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»अक्षय-अक्षया तरुण जोडप्याच्या मृत्यूने हळहळ
    अपघात

    अक्षय-अक्षया तरुण जोडप्याच्या मृत्यूने हळहळ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 22, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    धाराशिवच्या रत्नापूर पाटीजवळ सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर टाटा नेक्सॉन गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दाम्पत्याचा मृत्यू झाला. चार दिवसापूर्वीच अक्षय अन् अक्षया यांचा साखरपुडा झाला होता. पण आज काळाने घाला घातला. रत्नापूर पाटीजवळील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार कमानीला धडकली. वाशी तालुक्यातील पारा येथील अक्षय रामभाऊ शिनगारे( वय-25) आणि वाशी येथील अक्षया सुनिल चव्हाण (वय 23) अशी मयत नवीन वधू वरांची नावे आहेत. तर या अपघातात कारचालक गंभीर जखमी झालाय. अक्षया हिच्या परिक्षेसाठी दोघे लातूरला निघाले होते. त्यावेळी काळाने घाला घातला.

    वाशी तालुक्यातील चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या नवीन नियोजित वरवधूचा सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटीजवळील वळणावर टोल वेच्या कमानीला कार धडकून झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय आणि इजोरा रहिवाशी हल्ली मुक्काम वाशी येथील सुनील चव्हाण यांची मूलगी अक्षया यांचा गेल्या रविवारी (ता. १५) मांजरसुंबा येथील कन्हेया मंगल कार्यालयात साखरपुडा झाला होता.

    मयत नववधू अक्षया हिची आज लातूर येथे महापारेशनची परीक्षा होती परीक्षा देण्यासाठी वाशी येथून पहाटेच घरची टाटा नेक्सॉन गाडी क्र. एम एच २५ बी एफ ५०६४ गाडीतून जात असताना हा अपघात झाला. रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट येडशी टोलवेच्या कमानीला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुरडला गेला नववधू अक्षया सुनील चव्हाण (वय. २३) आणि वर मुलगा अक्षय रामभाऊ शिनगारे याचा (वय. २५) अपघातात जागीच मृत्यू झाला. तर चालक अक्षय यादव सिरसट (वय. २२)जखमी झाला आहे.

    अपघाताची माहिती मिळताच रत्नापूर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले जखमी चालकाला १०८ ला कॉल करुन उपचारासाठी पाठवले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येरमाळा प्राथमिक रुग्णालयात पाठवला. चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या तरुणीच्या अकाली मृत्यूने वाशी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

    accident Dharashiv Exam Latur Mahaparesan Exam Sakharpuda Solapur-Dhule Highway
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.