Monday, August 15, 2022

आकाशवाणी चौकातील सर्कलवर चढले पिकअप व्हॅन

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

जळगाव शहरामधील आकाशवाणी चौकात असलेल्या सर्कलवर पिकअप व्हॅन चढल्याची घटना घडली. सदर सर्कल उभारणीच्या वेळेसच भीषण अपघातांची शक्यता वर्तविण्यात आली होती. तरीदेखील हे सर्कल उभारण्यात आले. दरम्यान सदर घटना घडल्याने पुन्हा अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

भरधाव वेगाने धावणार्‍या पिकअप व्हॅनच्या चालकाला अचानक समोर सर्कल असल्याचे दिसले नसल्याने हे वाहन थेट सर्कलच्या कठडे तोडून वर चढल्याचे दिसून आले. यात चालकाला दुखापत झाली असून सुदैवाने प्राणहानी झाली नाही.

शहरातील आकाशवाणी चौकात कायम वर्दळ असून येथे नेहमी वाहतुकीची कोंडी होते. दरम्यान हे सर्कल उभारल्याने अनेक वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. यामुळे अपघात होण्याची मोठी शक्यता असल्याने या सर्कलला उभारणीसाठी विरोध केला जात होता. तरी देखील प्रशासनाने हे सर्कल उभारले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या