अजित पवारांचा विक्रम ; आज सादर करणार अर्थसंकल्प

लाडक्या बहिणी,शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी बजेटमध्ये काय असणार ?

0

अजित पवारांचा विक्रम ; आज सादर करणार अर्थसंकल्प

लाडक्या बहिणी,शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी बजेटमध्ये काय असणार ?

मुंबई वृत्तसंस्था

विधानसभा आणि विधानपरिषदेत या दोन्ही सभागृहात आज 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
या अर्थसंकल्पात लाडक्‍या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्‍याचे आश्‍वासन महायुती सरकार पुर्ण करणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
निवडणुकी आधी सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. याशिवाय अनेक योजनांची घोषणा केली. त्यामुळे त्याचा थेट ताण राज्याच्या तिजोरीवर पडला होता.

त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला. काही निकषही लावले गेले. काही योजनांच्या निधीला ही या योजनेमुळे चाप लावण्यात आला. या सर्व योजनांवर होणारा खर्च पाहता उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ कुठेही जमत नाही. त्यामुळे विकासकामांसाठी काहीच निधी शिल्लक राहात नसल्याचे सध्याचे चित्र आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार सोमवारी दुपारी २ वाजता राज्याचा अकरावा अर्थसंकल्प सादर करतील. यासह, ते दुसऱ्यांदा जास्तीत जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री बनतील. सर्वाधिक विक्रम काँग्रेसचे माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहे, ज्यांनी तेरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना पवार म्हणाले, “सुमारे २ लाख कोटी रुपयांची राजकोषीय तूट आणि निवडणुकीपूर्वीच्या लोकप्रिय खर्चामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. परिणामी, नियोजित खर्चाच्या फक्त ७०% खर्च होईल, खर्चात ३०% कपात होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.