Tuesday, November 29, 2022

त्याला शिंगे आली का ? अजित पवार संतापले

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या आक्षेपाहार्य वक्तव्याप्रकरणी अजित पवार चांगलेच संतापले.  तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील पवारांनी खोचक प्रश्न उपस्थित केला.

- Advertisement -

- Advertisement -

त्याला मस्ती आलीय?

पवार म्हणाले की, या बकालेला लाज लज्जा शरम आहे की नाही ? त्याला बडतर्फ केला पाहीजे. ‘पोलीस अधिकारी असला म्हणून काय झालं, त्याला काय शिंगे आली का ? का त्याला मस्ती आलीय? हे खपवून घेणार नाही’. काही अधिकारी असतात ज्यांना वरदहस्त असतो. तो म्हणतो मी कोणाला घाबरत नाही, माझं कोणी वाकडं करू शकत नाही. आता याचं वाकडंच झालं पाहीजे, बकाले याला बडतर्फ केलं पाहिजे आणि 10 पिढ्या त्याला आठवण झाली पाहिजे की असं कधी करता कामा नये, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तोफ डागली.

.. मग शिंदे उठतात कधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतात असा सांगितले जातेय, पण मग मुख्यमंत्री कधी उठतात? असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जळगावात जाहीर सभेत केला. मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे यांच्या टिकेला उत्तर देताना पैठणमध्ये सांगितले होते की, मी सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांचं काम करतो असे उत्तर दिले होते. त्यानंतर आता अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केलीय.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या