त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाहीय ?; अजित पवारांची टीका

0

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील दुष्काळी भागातील दौरा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) आणि सरकारवर जोरदार टीका केली.

राज्यात मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला नाही. हे कशात अडकले कळायला मार्ग नाही. त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही का? की जास्त आमदारांना मंत्रिपदाची प्रलोभने दिली? हे कळायला मार्ग नाही. सर्व खात्यांचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच आहेत. उपमुख्यमंत्र्यांलाही अधिकार नाही, आज सर्वच फाईल तुंबलेल्याच आहेत अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

पण केंद्राची टीम पाहणीसाठी आली नाही

तसेच पवार म्हणाले, सीएमने काही भागात दौरा केला, पण केंद्राची टीम पाहणीसाठी आले नाही. जिल्ह्यात नद्या वाहतात तेव्हा शेतीचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात जमिनी खरडून गेल्या, आजच्या घडीला दहा लाख क्षेत्रावरील पीके नष्ट झाली. कृषी विभागाने हंगाम जाण्यापूर्वीच उपाय करायला हवे.

तुटपुंजी मदत 

अजित पवार म्हणाले, राज्यात अतिवृष्टी झाली यात मृतांच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत मिळाली ती तुटपुंजी आहे. पशुधनाच्या नुकसानीचे मदत राज्यात मिळाले नाहीत. ती मदत तातडीने मिळवून देण्यासाठी सरकारने पाऊले उचलावीत. काहींच्या भिंती कोसळल्या, घरातील वस्तू, धान्यांचे नुकसान झाले. सर्वत्र नुकसान झाले या संकटातून सामान्यांना उभे करण्याचे आव्हान आहे. यात सरकारने तातडीने लक्ष द्यावे.

सर्वच फाईल तुंबलेल्या

अजित पवार म्हणाले, सर्व खात्यांचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत, उपमुख्यमंत्र्यांलाही अधिकार दिले नाही. प्रत्येक फाईल सीएमकडेच जाते. 43 जणांचे मंत्रिमंंडळ अस्तित्वात आल्यानंतरही सीएमला कामाचा ताण असतो, पण आज सर्वच फाईल तुंबलेल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.