अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वास !
31 डिसेंबरला रंगणार सोहळा : प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील पर्यटनस्थळी नववर्षाच्या स्वागतासाठी दि. 31 डिसेंबर रोजी प्रसिद्ध भारतीय संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वास आली असून जिल्ह्यासह अन्य जिह्यातूनही प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी हा देखणा सोहळा आयोजित करण्यात आला असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. 22 एकरच्या विस्तीर्ण परिसरात हा सोहळा प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणार आहे. दुपारी 2 वाजेपासून प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार असून रात्री 8 ते 12 दरम्यान प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल हे बहारदार गितांचे सादरीकरण करणार आहेत. रात्री 12 वाजेनंतर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात येणार असून संभाजीनगर येथील प्रसिद्ध डी.जे.व बॅन्डवर गाण्यांचा जलवा सादर होणार आहे. जामनेर तालुक्यातील गारखेडा परिसरातील वाघूर धरणाच्या बॅकवॉटरवर असलेल्या बेटावरील पर्यटनस्थळाच्या हिरवळीवर हा विलोभणीय कार्यक्रम होणार आहे. दि. 31 डिसेंबर 2024 रोजी नववर्षाच्या स्वागतासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 2 वाजेपासून विविध कार्यक्रमांना प्रारंभ होणार असून रात्री 8 ते 12 दरम्यान प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचा लाईव्ह कार्यक्रम होईल. प्रेक्षकांना कार्यक्रमस्थळ गाठण्यासाठी वाघूरच्या पाण्यातून बोटीच्या माध्यमातून जावे लागणार आहे.
प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगावात अजय-अतुल यांचा पहिल्यांदाच लाईव्ह कार्यक्रम होत असून याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जळगाव जिल्ह्यासह अन्य भागातूनही प्रेक्षक या सोहळ्याला उपस्थिती देणार आहेत.
हा देखणा सोहळा यशस्वी करण्यासाठी व पर्यटन वाढीला चालना मिळावी यासाठी पुढाकार घेतला जात आहे. अजय-अतुल या प्रसिद्ध संगीतकार जोडीचा लाईव्ह कार्यक्रम म्हणजे एक पर्वणीच प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा; अधिक माहितीसाठी (9096961685), (9511770619) किंवा (7559225084) येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.