धक्कादायक : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील पर्यटकांना पिण्यासाठी कुंडातील पाणी !
अजिंठा लेणी व्यवस्थापन करतेय देशी - विदेशी पर्यटकांच्या जीवाशी खेळ ; आठ महिन्यापासून तोंडापूर धरणातून होणारा पाणीपुरवठा खंडित
धक्कादायक : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील पर्यटकांना पिण्यासाठी कुंडातील पाणी !
अजिंठा लेणी व्यवस्थापन करतेय देशी – विदेशी पर्यटकांच्या जीवाशी खेळ ; आठ महिन्यापासून तोंडापूर धरणातून होणारा पाणीपुरवठा खंडित
वाकोद ता जामनेर
जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांमध्ये हजारोच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना अजिंठा लेणी व्यवस्थापक नऊ महिन्यापासून पिण्यासाठी कुंडातील पाणी पिण्यासाठी देत असल्याने एक प्रकारे लेणी व्यवस्थापक देशी विदेशी पर्यटकांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे .
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठाच्या लेण्या आहे .या लेण्यांमध्ये वर्षभरात लाखोच्या संख्येने पर्यटक येत असतात .मोठ्या प्रमाणात बुद्धिस्ट देशातून या लेण्याची पाहणी करण्यासाठी पर्यटकांचा ओघ सुरूच असतो .अजिंठा लेणी येथे तोंडापूर येथील धरणातून जल जीवन मिशन अंतर्गत लेणीत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता .
मागील अनेक वर्षापासूनमहाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने थकित बिला पोटी रक्कम न भरल्यामुळे दिनांक १९/०६/२०२४ रोजी पासून अजिंठा लेणीत जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा करणारी योजना बंद आहे .जवळपास आठ ते नऊ महिन्यापासून देश व विदेशातील पर्यटकांना लेणी व्यवस्थापक कुंडातील पाणी फिल्टर केल्याच्या नावाखाली सारांशपणे पाजत आहे .अजंठा लेणीच्या सात कुंडाच्या वर छोटेसे लेनापुर गाव वसलेले आहे .या गावातील सांडपाणी सुद्धा या नदी द्वारे याच कुंडामध्ये पोहोचते कुंडातील व सांडपाणी एकत्रित होऊन हे पाणी फिल्टर करून पर्यटकांना पिण्यासाठी दिले जाते
.हे पाणी अद्याप पर्यंत लॅब मध्ये तपासणी करण्यात आलेले नाही . फिल्टर झालेले पाणी विदेश व देशातील पर्यटकांसाठी पिण्यायोग्य आहे का ? याची कुठलीही चाचणी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने करण्यात आलेली नाही .याची भारतीय पुरातत्व विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की पर्यटकांना मिळणारे पाणी पिण्यायोग्य आहे ?किंवा नाही याची कुठलीही चाचणी आमच्या वतीने करण्यात अली नसल्याचे सांगण्यात आले. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी अंगणी होत आहे.