जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचे मोफत दर्शन..

0

 वाकोद, लोकशाही न्यूज नेटवर्क  

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Swatantracha Amrut Mahotsav) शुक्रवार दि. ०५ ते स्वातंत्र्य दिनापर्यंत अजिंठ्याच्या लेणीत (Ajanta Caves) विनामुल्य प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा भारतीय  पुरातत्व विभागाने केली असून पहिल्यांदा विनामुल्य अजिंठा लेणीत प्रवेशाचा पर्यटकांनी लाभ घेतल्याने पर्यटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत विनामुल्य प्रवेश देण्याचा निर्णय भारतीय पुरातत्व विभागाने घेतला आहे. त्यामुळे आजपासून अजिंठा लेणीत मोफत भ्रमंती सुरु झालेली असून या निर्णयामुळे पर्यटकांच्या खिशाला बसणारा भुर्दंड कमी होणार असून जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत जाण्यासाठी आता दहा दिवस केवळ बसचे भाडेच लागणार असून अजिंठा लेणीचे तिकीट दहा दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणींमध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या वतीने शुक्रवारी विदेशी पर्यटकांना अजिंठा लेणीमध्ये मोफत प्रवेश देण्यात आला.

एएसआयचे मेमोरियल-2 चे संचालक डॉ.एन.के.  पाठक यांनी बुधवारी हा आदेश जारी केला आहे.  त्यात म्हटले आहे की, 5 ऑगस्टपासून सर्व स्मारके, पुरातत्व स्थळे आणि संग्रहालये पर्यटकांसाठी पूर्णपणे मोफत केली जातील.  या साइट्सवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.  याबाबतचे आदेश सर्व प्रादेशिक संचालक व संबंधितांना पाठविण्यात आले आहेत.

पर्यटकांसाठी मोफत

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्व स्मारके, पुरातत्व स्थळे आणि संग्रहालये पर्यटकांसाठी मोफत करण्याची घोषणा केली आहे. या आदेशानुसार भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने शुक्रवारपासून जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश दिला जात आहे. अजिंठा लेणीमध्ये देशी-विदेशी पर्यटकांना १५ ऑगस्टपर्यंत मोफत प्रवेश दिला जाणार आहे.  शुक्रवारी लेणी पाहण्यासाठी आलेल्या देशी-विदेशी पर्यटकांनी स्वत:ला भाग्यवान मानले.  त्यांनी भारतीय पुरातत्व विभागाचेही आभार मानले.  अजिंठा लेणीत शनिवार व रविवारी पर्यटकांची गर्दी असते.

पावसाळ्यात अजिंठा लेणी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक ऋतूचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत.  लेण्यांचे सौंदर्य आणि वाहणारे धबधबे, त्यातच पर्यटक आपल्या कुटुंबीयांसह त्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.  आणि अशा परिस्थितीत 15 ऑगस्टपर्यंत लेण्यांमध्ये मोफत प्रवेश मिळणे अधिक मजेशीर झाले आहे.  अजिंठा लेणी, एलोरा लेणी, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला यासह  पर्यटन स्थळांवर देशी-विदेशी पर्यटकांना दहा दिवस मोफत प्रवेश असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.