
लोकशाही न्यूज नेटवर्क
अहमदाबाद मध्ये देशाला हात लावणारी एक घटना घडली आहे. २४२ प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान रहिवासी भागात कोसळल्याने असंख्य प्रवासांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. हे विमान दंडनला जात होते. सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून हे विमान निघाले होते. मात्र टेकऑफच्या वेळीच या विमानाला भीषण अपघात घडला. ज्या भागात हे विमान कोसळले तो परिसर संपूर्ण रहिवासी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर माहिती अशी की, अहमदाबादमधील मेघाणी नगर या रहिवासी भागात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली. विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. टेकऑफनंतर काही मिनिटांतच हे विमान कोसळल्याची माहिती आहे. अपघातानंतर परिसरात जोरदार स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोट दिसले. स्थानिक नागरिकांनीही याला दुजोरा दिला आहे.

दरम्यान अपघातस्थळी तात्काळ अग्निशमन दल, पोलीस, आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. अनेक जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. एअर इंडियाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. प्रशासनाने परिसर सील केला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण अहमदाबाद शहरात शोककळा पसरली आहे. या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल जाला आहे.
अहमदाबादमधील मेघाणी नगर परिसरात एअर इंडियाचे विमान कोसळलं. परिसरात मोठ्या स्फोटाचा आवाज झाला. जिकडे तिकडे धुराचे लोट दिसत होते. धुरामुळे परिसरात घाबरलेलं वातावरण निर्माण झालं. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखळ झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक पोलिस आणि बचावकर्मी घटनास्थळी आहेत. या अपघाताचा तपास आणि कारणांचा शोध घेण्यात येत आहे.
दुर्घटनेनंतर घटनास्थळी काळ्या धुराचा लोट पसरला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान कोसळताच मोठा स्फोट झाला आणि आकाशात धुराचा लोट दिसू लागला. मेघानी नगरातील रहिवासी भागात ही घटना घडल्याने स्थानिकांना मोठा धक्का बसला. घटनास्थळी तातडीने बचाव पथकाच्या गाड्यागाड्या आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या. बचावकार्य सुरू असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मात्र, अद्याप मृताची नेमकी संख्या समजू शकलेली नाही.
एअर इंडियाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली असून, विमान कोसळण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक प्रशासनाने परिसर सील केला असून, रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. या घटनेने अहमदाबाद शहरात शोककळा पसरली असून, बचावकार्य आणि चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

