एअर इंडियाची प्रतिष्ठित इमारत महाराष्ट्र सरकारने केली खरेदी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र सरकार नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाची प्रतिष्ठित इमारत खरेदी केली आहे. तिचे मंत्रालय विस्तारात रूपांतर करण्याचा सरकारचा विचार आहे. या इमारतीची मालकी असलेल्या एआय अॅसेट्सहोल्डिंग लिमिटेडने राज्य सरकारच्या १,६०० कोटी रुपयांच्या ऑफरला सहमती दर्शवली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली होती आणि महाराष्ट्र सरकारला इमारत विकत घेण्यासाठी प्राधान्य देण्याची विनंती केली होती. अधिकाऱ्याने सांगोतले की फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात इमारतीसाठी बोलणी सुरु केल्यानंतर, एमव्हीए सरकारच्या अंतर्गत २०२१ मध्ये पुन्हा चर्चा सुरु झाली, परंतु कोणताही करार अंतिम झाला नाही.

१९९३च्या साखळी बाम्बस्फोटातही ही इमारत दहशतवाद्यांचे लक्ष्य बनली होती. प्रचंड संकटातून जात असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एअर इंडियाने २०१८ मध्ये २३ मजली इमारत विकण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती खरेदी करण्यात रस दाखवला होता.

मंत्रालयाचे काम एकाच छताखाली आणणे हा त्याचा उद्देश होता. खरेदी सुरु असतांनाच विधानसभेच्या निवडणूका झाल्या त्यात सत्तापरिवर्तन झाले आणि सौदा पुढे जाऊ शकला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.