Friday, December 2, 2022

ऐनपुर येथे अल्पवयीन मूलीवर अत्याचार

- Advertisement -

ऐनपुर, ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे एका चाळीस वर्षीय व्यक्तीने १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना ऐनपुर शिवारात घडली.

- Advertisement -

तालुक्यातील ऐनपुर येथे दि. १७ रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी नितीन मधुकर पाटील (वय ४०) व सहकारी महिला (वय ३०) यांनी  संगनमत करुन पीडित अल्पवयीन मुलीला संशयित आरोपी नितिन पाटील यांच्या ऐनपुर शिवारात असलेल्या  शेतात काड्या वेचण्याचा उद्देश्याने महिला आरोपीने बोलवून आरोपी नितिन पाटील याने अश्लील बोलून सदर पीडित बालिकेवर अत्याचार केला.

- Advertisement -

याबाबतची निंभोरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने दोन्ही आरोपी विरुद्ध भाग ५ गु.र.नं.१७०/२२ भा.द.वि.कलम ३७६ ,पोक्सो कायदा कलम ४,६ तसेच अनुसुचित जाती-जमाती कायद्याअन्वये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास फैजपुर डीवाएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलिस ठाण्याचे स.पो.नि. गणेश धुमाळ व पोलिस करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या