जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग यांची मासिक आढावा सभा

0

जळगाव :-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षते खाली जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग यांची मासिक आढावा सभा ९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे दुपारी ३.वाजता घेण्यात आली सदर सभेमध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव श्री अंकित, जिल्हा आरोग्य अधिकारी , डॉ. आकाश चौधरी, डॉ. सचिन बाहेकर, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ विजय गायकवाड, जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील कार्यक्रमाधिकारी श्री संजय पहुरकर, जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील श्री गिरीश गडे, तसेच जिल्हा एड्स नियंत्रण विभागा अंतर्गत वेगवेगळ्या विविध गटामध्ये कार्यरत सामाजिक संस्थाचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी एड्स नियंत्रण विभागाच्या कार्यक्रमाचा आढावा व मागील सभेमध्ये झालेल्या विषयावर केलेल्या कार्यवाहीबाबत आढावा घेण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील एच.आय.व्हि चाचणीचे उद्दिष्ट ७५% पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले. तसेच तालुका स्तरावरील एच.आय.व्हि संसर्गितांची मॅपिंग करण्यात आली, एच.आय.व्हि संसर्गित बालकासाठी प्रोटीन पावडर उप्लब्धतेकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला. सोशल मीडियावर एच.आय.व्हि / एड्स विषयी प्रसिद्धी करण्यात आली .

सदर बैठकीदरम्यान एच.आय.व्हि / एड्स टोल फ्री क्रमांक ‘१०९७, एच.आय.व्हि / एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा २०१७, एच.आय.व्हि / एड्स QR कोड चे प्रकाशन मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व श्री अंकित, डॉ.अंकित चौधरी, संजय पहुरकर, गिरीश गडे यांचे हस्ते करण्यात आले.

तसेच जिल्ह्यातील एच.आय.व्हि सह जगणाऱ्या लोकांना व अति जोखीम गटातील लोकांना राशन कार्ड, धान्य पुरवठा तसेच शासकीय योजना मिळणेबाबत, जिल्यातील जास्तीत जास्त खाजगी प्रयोगशाळा / रुग्णालये यांनी जिल्हा एड्स नियंत्रण विभागास एच.आय.व्हि प्रत्येक महिन्याला सादर करणेबाबत मा.जिल्हाधिकारी , जळगाव यांनी आदेशित केलें. जिल्हा स्तरावर जिल्हा माहिती अधिकारी यांचे मार्फत बल्क SMS व पोस्टर च्या माध्यामातून जास्तीत जास्त एच.आय.व्हि / एड्स विषयी जनजागृती करण्याबाबत सूचित केले

Leave A Reply

Your email address will not be published.