Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकशाही विशेष»एआय आणि पुस्तक : जागतिक पुस्तक दिन विशेष!
    लोकशाही विशेष

    एआय आणि पुस्तक : जागतिक पुस्तक दिन विशेष!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 22, 2026No Comments89 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही विशेष लेख

    संपूर्ण जगभरात जागतिक पुस्तक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आजच्या या विशेष प्रसंगी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’ चा वापर करून कशा पद्धतीने पुस्तकांशी मैत्री अधिक घट्ट करता येईल व पुस्तक निर्मिती आणि वाचन अधिक प्रभावीपणे कसे करता येईल या विषयी आपण जाणून घेणार आहोत. तंत्रज्ञानाच्या या युगात वाचकांना पुस्तक वाचनाचा आणि निर्मितीचा एक वेगळा अनुभव ‘एआय’च्या माध्यमातून मिळत असून वाचनाची आवड असलेल्या व आपल्या कल्पनेतून पुस्तक निर्मिती करणाऱ्या लेखकांना देखील आता ‘एआय’ ची मैत्री खूप उपयुक्त ठरणार आहे.

    मित्रहो, आज आपल्या सभोवताली विविध तंत्रज्ञानाचा वापर होतांना आपण पाहतो, किंबहुना आपण स्वतः देखील त्यांचा वापर करीत आहोत. मानवाने केलेली ही प्रगती खरोखरच उल्लेखनीय असून मानवी गरजा आणि अडचण ओळखून सातत्याने केल्या जाणाऱ्या संशोधनातून नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. अगदी समुद्राच्या खोलीपासून ते चंद्रापर्यंत मानवाने आपले अस्तित्व सिद्ध केले,  मात्र ही प्रगती साधण्यासाठी अनेक महत्त्वाचे टप्पे ओलांडण्यात आले आहेत व त्यातूनच आजचे हे प्रगत विश्व आपल्या सर्वांसमोर आहे. अगदी ज्ञानाच्या शोधापासून तर ज्ञाननिर्मिती पर्यंतचा हा प्रवास तितकाच मनोरंजक देखील आहे.

    गेल्या अनेक वर्षांपासून विविध युगातील मानवांनी त्यांच्या-त्यांच्या परीने प्रगती करण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या कडे असलेले ज्ञान हे येणाऱ्या पिढीसाठी संग्रहित करून ठेवले आहे. ज्ञान संग्रहनाच्या या प्रक्रियेत महत्त्वाचा वाटा मानला जातो तो ग्रंथांचा, पुस्तकांचा आणि असंख्य प्रकाशित व अप्रकाशित संसाधनांचा ज्यांच्यामुळे एका पिढीतील ज्ञान हे दुसऱ्या पिढीकडे व दुसऱ्या पिढीकडील ज्ञान हे तिसऱ्या पिढीकडे पोहोचविण्यात मदत झाली. या ज्ञानप्रवाहाची मोठी जबाबदारी ही पुस्तकांनी घेतली व पुस्तकांच्या माध्यमातून शालेय शिक्षणापासून तर संशोधनापर्यंतचे ज्ञान हे सहज प्राप्त होऊ लागले. इतकेच नव्हे तर काळानुरूप पुस्तकांनी देखील आपले अस्तित्व व स्वरूप बदलले. वाचकांच्या सोयीनुसार पुस्तक देखील आपल्या मूळस्वरूपापेक्षा वेगळे होऊ लागले. छापील स्वरूपातील पुस्तकापासून तर ऑडिओ बुक चा प्रवास हे याचीच साक्ष आहे. गुटेनबर्गच्या छपाईच्या शोधापासून तर ‘एआय’ च्या युगात देखील पुस्तकांचे महत्त्व सातत्याने टिकून आहे. चला तर मग पुस्तकांच्या वापरात ‘एआय’ ची भूमिका पाहूया,

    पुस्तक वाचन आणि एआय:

    पुस्तक वाचन ही एक कला असून मानवाला ही कला गेल्या कित्येक वर्षांपासून अवगत आहे. मात्र आजच्या या धावपळीच्या युगात पुस्तक वाचनासाठी वेळ देणारी माणसे दिवसागणिक कमी होत आहेत. आज ज्ञानप्राप्तीपेक्षा फक्त माहिती प्राप्तीसाठी पुस्तकाचे वाचन करणारे वाचक अधिक आहेत. जे केवळ हवी असलेली माहिती प्राप्त करण्यापुरतेच पुस्तकाचा वापर करतात. पूर्ण पुस्तक वाचन करणाऱ्या वाचकांची संख्या कमी आहे. शिवाय पुस्तकांच्या प्रकारावर देखील त्यांचे वाचन अवलंबून असते. सर्वच पुस्तके पूर्ण वाचनासाठी नसतात. उदा. संदर्भ ग्रंथ, शब्दकोश, ज्ञानकोश हे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचणे अपेक्षित नसते, त्यांचा उपयोग गरजेनुसार केला जातो. मात्र पूर्ण पुस्तकाचे वाचन करण्यात लागणारा वेळ आणि आवड हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. हा सर्व विचार करता पुस्तक वाचनात देखील ‘एआय’ आपली भूमिका पार पाडतो.

    जर पूर्ण पुस्तक वाचण्यासाठी वेळ नसेल आणि त्यातील सार जाणून घ्यायचा असेल तर ‘एआय’ च्या मदतीने ते शक्य होते. पुस्तकातील ठराविक माहिती शोधायची असेल तरी देखील ‘एआय’ अगदी कमी वेळेत सदर माहिती शोधून देतो. ‘एआय’ द्वारे एकाच वेळी अनेक पुस्तकांतील माहिती क्षणार्धात प्राप्त होते. चॅटबोट सारख्या ‘एआय’ टूल्सचा वापर करून पुस्तकांशी संवाद साधता येतो. विविध भाषेतील पुस्तकांची माहिती आपल्याला हव्या असलेल्या भाषेत उपलब्ध होते. पुस्तकातील माहितीचा सारांश देखील उपलब्ध होतो. ई-बुक किंवा पीडीएफ स्वरूपातील पुस्तकांवर तर ‘एआय’ द्वारे विविध पद्धतीने माहिती प्राप्त करता येते. ‘एआ’ तुमच्या वाचनाचे मुद्दे लक्षात घेऊन तुम्हाला आवडतील अशी पुस्तके सुचवू शकतो, पुस्तकांमधील कठीण विषय वाचकांच्या क्षमतेनुसार समजवून सांगू शकतो. टेक्स्ट-टू-स्पीच या पर्यायाच्या सहाय्याने नैसर्गिक (स्त्री किंवा पुरुष यांच्या) आवाजात पुस्तकांचे वाचन करता येते, ज्यामुळे दृष्टिहीन व्यक्तींना, वायो वृद्धांना, कामात व्यस्त असलेल्या व्यक्तींना किंवा ऑडिओबुक पसंत करणाऱ्यां वाचकांना पुस्तक वाचनाचा आनंद घेता येतो.

    काही ‘एआय’ टूल्स पुस्तकातील मजकुरावर आधारित चित्र निर्मिती, क्विझ निर्मिती किंवा फ्लॅशकार्ड निर्मिती करून देतात, ज्यामुळे पुस्तक वाचन प्रक्रियेत मनोरंजकता निर्माण करता येते आणि पुस्तक वाचण्यात विद्यार्थ्यांना किंवा वाचकांना आनंद मिळतो. ‘एआय’ द्वारे पुस्तकाचे वाचन करतांना त्यातील नकाशे, पात्र किंवा दृश्य यांचा अधिक उत्तम समन्वय साधता येतो. तंत्रज्ञानाच्या अतिवारामुळे पुस्तकांशी दुरावलेले व वाचक ‘एआय’ चा वापर करून पुन्हा एकदा पुस्तकांच्या सानिध्यात येतील यांसाठी विविध प्रयोग करणे अपेक्षित आहे.

    पुस्तक निर्मिती आणि एआय

    पुस्तक निर्मिती ही एक तांत्रिक बाब असून यांत अनेक कार्यांचा समावेश होतो जसे की,  विषयाची निवड, लेखन, रचना, बांधणी, छपाई, डिझाईनिंग इत्यादी. या सर्व प्रक्रियेत ‘एआय’ चा वापर करून उत्तम दर्जाची पुस्तक निर्मिती करणे सहजशक्य झाले आहे. ‘एआय’ लेखनाच्या विषयाला पूरक असे शीर्षक सुचवू शकतो, ज्यामुळे लेखकांना विषयाबद्दल अधिक कल्पकता निर्माण होते. तसेच लेखनासाठी आवश्यक असलेला मसुदा तयार करण्यात, भाषाशैलीत सुधारणा करण्यासाठी देखील ‘एआय’ चा वापर उपयुक्त ठरतो. लेखनातील दुरुस्ती उदा. व्याकरण, शब्दलेखन, कथानकातील विसंगती किंवा पुनरावृत्ती शोधण्यात देखील ‘एआय’ चा वापर करता येतो. पुस्तकाच्या प्रकरण रचनेत देखील मार्गदर्शन करू शकतो, लेखनासाठी आवश्यक संदर्भ उपलब्ध शोधण्यात व त्यांची मांडणी करण्यात देखील ‘एआय’ चा वापर हा प्रभावी ठरतो. इतकेच नव्हे तर, मुखपृष्ठ डिझाईन, आतील पानांची डिझाईन आणि सूचींची मांडणी देखील आवश्यक त्या स्वरूपात करून देऊ शकतो. यामुळे पुस्तक निर्मिती प्रक्रियेत अधिक मदत होते व कार्य लवकर पूर्ण केले जाऊ शकते.

    एखाद्या घटनेचे किंवा दृश्याचे वर्णन लक्षात घेऊन त्यानुसार छायाचित्रे निर्माण करण्यात ‘एआय’ सहकार्य करतो. आकृती, आलेख काढण्यात देखील सहज सोपे होते. ‘एआय’ पुस्तकाचे संपादन किंवा लेखन सहाय्य देखील करू शकतो. इतकेच नव्हे तर पुस्तकांच्या मार्केटिंग, विक्री आणि वितरण यासाठी देखील ‘एआय’ चा वापर करून पुस्तकांना बाजार पेठ उपलब्ध करून देता येते. प्रकाशक देखील ‘एआय’ च्या सहाय्याने वाचकांचा कल जाणू शकतात व त्यानुसार पुढील प्रकाशन कसे असावे याचा अंदाज लावू शकतात. फक्त छापील पुस्तकच नव्हे तर एआयचा वापर करून ई-बुक निर्मिती आणि त्याचे योग्य फॉरमॅटिंग करता येते. तसेच एखाद्या लेखकाकडे उपलब्ध असलेल्या मूळ लेखनाला एआय-निर्मित आवाजाने ऑडिओ स्वरूप देणे सहज शक्य होते आणि यातून ऑडिओबुक देखील निर्माण करता येते.

    आज प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाईलमुळे आणि ई-बुक, ऑडिओबुक्स, डेटाबेस आणि डिजिटल ग्रंथालयांमुळे पुस्तके अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहेत. वाचक कुठेही व कधीही आपल्या आवडीचे पुस्तक वाचू किंवा ऐकू शकतात. एकंदरीत पाहता ‘एआय’ पुस्तक वाचण्याचा आनंद कमी करत नाही, तर वाचन अधिक वैविध्यपूर्ण आणि मनोरंजक पद्धतीने बनविण्यात सहकार्य करतो. वाचन हे केवळ माहिती प्राप्तीसाठी नव्हे तर ज्ञानप्राप्ती, वैचारिक प्रगल्भता, मनोरंजन, अध्यात्म आणि समाधानासाठी देखील केले जाते. यामुळे प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार सातत्याने वाचावे हाच खरा संदेश आज या माध्यमातून द्यावासा वाटतो.

    डॉ. हितेश गोपाळ ब्रिजवासी
    ग्रंथपाल, विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत
    के.ए.के.पी संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जळगाव
    मो. ९६०४००९९९७

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?

    September 7, 2026

    अनिलभू… आता जोमाने कामाला लागा!

    September 3, 2026

    निष्पाप बळी : लोकप्रतिनिधी मूग गिळून का?

    August 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif