अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार– एकनाथ शिंदे

0

नगर;- अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

आज पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अहिल्यादेवींचे जन्मस्थान असणार्‍या नगर जिल्ह्यातील चौंडी येथील कार्यक्रमाला हजेरी लावली. याप्रसंगी त्यांनी अहमदनगरचे नवीन नाव हे अहिल्यानगर असेल असे जाहीर केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांचा आदर्श घेण्यासारखा असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर नेत्यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.