पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त जळगाव येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम

0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त जळगाव येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम

छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात ऐतिहासिक ठेव्याचा दर्शन सोहळा

        जळगाव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने प्रेक्षकांना अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रावर आधारित नाट्य, संगीत व दृक-श्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून ऐतिहासिक ठेवा पाहण्याची संधी मिळाली. त्री जन्मशताब्दी दिनानिमित्त अहिल्यादेवींना वंदन करणारा, नमन करणारा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित शाहिरी-पोवाडे, नृत्य, नाट्य, संगीत अशा विविध कलांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाची निर्मिती परिवर्तन संस्थेच्यावतीने शंभू पाटील व नारायण बाविस्कर यांनी केली होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी  विजयकुमार ढगे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, उद्योजक किरण बच्छाव, सुरेंद्र पाटील, नहीचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, आर्किटेक शिरिष बर्वे, नारायण बाविस्कर, सुभाष सोनवणे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी अहिल्यादेवींच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, “अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हा निस्वार्थ सेवा, न्यायप्रियता आणि सामाजिक परिवर्तनाचा आदर्श आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण समाज उन्नतीसाठी कार्य करावे.”

जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी अहिल्याबाईंच्या कार्याचा ऐतिहासिक धांडोळा घेऊन इतिहासातील अहिल्यादेवींच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. जळगाव शहरात अहिल्यादेवींचे स्मारक व्हावे यासाठी पाठपुरावा करणारे व त्यासाठी पुढाकार घेणा-यांमधील एक प्रमुख कार्यकर्ते सुभाष सोनवणे यांचा सन्मान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

परिवर्तनच्यावतीने नाट्यप्रयोगाची निर्मिती करण्यात आली. कार्यक्रमाचे दिग्दर्शक हर्षल पाटील, नाट्य दिग्दर्शक हनुमान सुरवसे, संगीत दिग्दर्शक शरद भालेराव, नृत्य दिग्दर्शक नाना सोनवणे यांचे होते. ७० कलावंतांचा सहभाग असलेल्या नाटकात अहिल्याबाईंच्या जीवनातील विविध प्रसंगांची नाट्यात्मक मांडणी करून सादर केले होते. आकर्षक वेशभूषा, प्रभावी संगीत, उत्तम शाहिरी साथ, गाणी, नृत्य आणि अभिनेत्यांनी केलेला उत्तम अभिनय याद्वारे हा सांस्कृतिक कार्यक्रम प्रभावीपणे सादर करण्यात आला. प्रेक्षागृहात अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. रसिकांनी नाटकास उत्तम दाद दिली. अहिल्यादेवींच्या जिवनावरील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी  मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव तथा अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभागाचे विकास खारगे व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांचे सहकार्य लाभले होते. अहिल्यादेवींचे कार्य हे आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असून या थोर समाजसेवी कर्तृत्ववान महिलेच्या कार्याची ओळख सर्वांना व्हावी यासाठी ही निर्मिती केल्याचे शंभू पाटील यांनी सांगितले.

नाटकात नेहा पवार, दिपक महाजन, तन्वी काटकर, गणेश सोनार, मंगेश कुलकर्णी, होरिलसिंग राजपूत, अक्षय नेहे, योगीता भालेराव, विकास वाघ, गणेश सोनार, पवन भोई यांच्यासह ६० कलावंत सहभागी होते. रंगभूषा चिंतामण पाटील यांनी तर वेशभुषा अजय पाटील यांनी केली होती. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व कलावंतांचा सन्मान करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.