शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध !

पालकमंत्री गुलाबराव पाटील : ‘अग्रिस्टेक’च्या माध्यमातून मिळणार लाभ

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

‘अग्रिस्टेक’ च्या माध्यमातून मिळणाऱ्या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभता मिळेल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व सक्षमता वाढणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध आहे. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या दृष्टीने ‘ॲग्रिस्टॅक’ योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. शेतकऱ्यांचे ओळखपत्र हे त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव तालुक्यातील मुसळी बु॥ येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नितीन पाटील, मोहन मराठे, कमलाबाई पाटील, भगवान पाटील, सीताराम पाटील, हिरामण पाटील, प्रेमराज गुंजाळ, देविदास मराठे, वसंत पाटील या शेतकऱ्यांना ओळखपत्र प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमास प्रांताधिकरी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, गट शिक्षणाधिकारी भावना भोसले, कृषी अधिकारी श्री. देसले, श्री. कोळी, नायब तहसीलदार श्री. सातपुत, श्री. मोरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठक्ष  सरपंच सुरेखा सुरेश गुंजाळ, उपसरपंच वसंत भिल, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटीलयांनी परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन उपशिक्षक संजय गायकवाड यांनी तर आभार पी. के. पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.