‘अग्निपथ’ योजना- गृहमंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

केंद्र सरकारने घोषित केलेल्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. बिहारमध्ये या नव्या योजनेबाबत रस्त्यावर उतरून संघर्ष सुरू आहे.  त्यातच, आता केंद्रीय गृहमंत्रालयाने या योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, असम रायफल्स आणि सीएपीएफ तुकड्यांमध्ये भरती होणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. तर, भरतीसाठीच्या वयोमर्यादेतही 2 वर्षे वाढ करण्यात आली आहे.

अग्निपथ योजनेविरुद्ध आज शनिवारी पहाटे जेहानाबादमध्ये तरुण रस्त्यावर आले आणि त्यांनी जाळपोळ सुरू केली. देशभरातील अनेक भागांतून या योजनेला विरोध होत असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने आणखी एक निर्णय जाहीर केला आहे. या योजनेंतर्गत 4 वर्षे सेवा बजावणाऱ्या जवानांना भरती प्रक्रियेत प्राथमिकता देण्यात येणार आहे. तर, असम रायफल्स आणि सीएपीएफ तुकड्यांमध्ये भरती होणाऱ्यांना भरती प्रक्रियेत 10 टक्के आरक्षण देण्यात येईल. तर, कोविडमुळे लांबलेल्या 2 वर्षांच्या भरतीप्रक्रियेमुळे या योजनेतील उमेदवारांना भरतीसाठीची वयोमर्याद वाढविण्यात आली आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सकाळी ट्विट करुन अग्निपथ योजनेचं स्वागत केलं आहे. यासंदर्भात आज गृह मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की, अग्निपथ योजनेंतर्गत 4 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या असम रायफल्स आणि सीएपीएफच्या जवानांना 10 टक्के आरक्षणासह प्राधान्य देण्यात येत आहे. या निर्णयानुसार योजनेवर सविस्तर काम करण्यास सुरुवात झाल्याचंही शहा यांनी सांगितलं. तसेच पहिल्या वर्षी या योजनेसाठी वयोमर्यादा 2 ने वाढवून 21 ऐवजी 23 वर्षे करण्यात आली आहे. त्यामुळे, वय वर्षे 23 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना यो योजनेचा लाभ घेता येणार आहे.

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधातील हे लोण आता १३ राज्यांत पसरले आहे. बिहारसह उत्तर प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, हरयाणा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यात आंदोलकांनी उग्र निदर्शने केली. यात बिहार व तेलंगणध्ये प्रत्येकी एक मिळून दोघांचा मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.