साईभक्तांना अडविणाऱ्या एजंटांची पोलिसांकडून धरपकड

दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीत पोलीसांची कारवाई

0

 

शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांत शिर्डीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी परिसरात खळबळ उडाली होती. या दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आले असून शेकडो पोलिसांचा फौजफ़ाटा रस्त्यावर उतरला आहे. प्रामुख्याने साईभक्तांना अडविणाऱ्या एजंटांची पोलिसांकडून धरपकड सुरु झाली आहे.

शिर्डीच्या साई संस्थानमधील दोन तरुण कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना मागील आठवड्यात घडली. शिर्डीतील या दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली. यानंतर साई संस्थानने देखील दोन मोठे निर्णय घेत साई संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ड्युटीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले असून रस्त्यावर उतरत कारवाईची मोहीम राबवत आहेत.

शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर पोलिस एक्शन मोडवर आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेकडो पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला आहे. यात पोलिसांकडून साईभक्तांना अडवणारे एजंट तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांची धरपकड मोहीम सुरु करण्यात आली आहे. वेगवेगळ्या परिसरातील या कारवाईमध्ये सकाळपासून शंभर हुन आधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीत कारवाईचा धडाका सुरु करण्यात आला आहे. अवैध प्रवासी वाहतूक, विना नंबरप्लेट वाहने, फेरीवाले, पथ विक्रेते, कमीशन ऐजंट त्याच बरोबर संशयित फिरणाऱ्या महिला आणि पुरुषांची धरपकड मोहीम करण्यात येत आहे. तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारी अवैध प्रवासी वाहने शिर्डी वाहतूक शाखा आणि आरटीओच्या पथकाने जप्त केली आहेत.

शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर साई मंदिराच्या भोजनालयात आता सरसकट प्रवेश बंद करण्यात आला आहे. दर्शन रांगेतून येणारे भक्त आणि निवासस्थानात राहणाऱ्या भक्तांना मोफत भोजनप्रसाद पास वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्याच्याकडे पास असेल त्यालाच भोजनालयात प्रवेश देण्यात येणार आहे. आजपासुन निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.