लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात सध्या गाजत असलेल्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. भोंदूबाबाच्या काळ्या कारनामांची SIT तपासामार्फत रोज नवनवीन यादी समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला SIT ने ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली होती. मात्र या चौकशी दरम्यान हर्षवर्धनने बऱ्याचा प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल झाला आहे.
हर्षवर्धन खरातचा मोबाईल बंद असल्याने तपास यंत्रणांनी खरातच्या मुलाचा फोन नॉट रिचेबल येत असल्याची माहिती आहे. हर्षवर्धन खरातचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांनी खरातच्या निवासस्थानी शोध घेतला असता मुलगा तेथे सापडला नाही. त्यामुळे हर्षवर्धन खरात चौकशी टाळण्यासाठी गायब झाला का? अशा चर्चा सुरू आहे.
भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरात मागच्या अनेक दिवसांपासून फरार असून तिच्या मागावर पोलीस आहे. असे असतानाच आता मुलगा हर्षवर्धन फरार झाल्याने तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. चौकशी सुरू असल्याने मुलाने शहर सोडण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. मात्र कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करताच खरातचा मुलगा गायब झाला का? की दुसरे कुठले कारण आहे अशी शंका उपस्थित होत आहे.

