Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अंगणवाडी सेविकेच्या मृत्यूनंतर भावजयीने लाटले मानधन
    ताज्या बातम्या

    अंगणवाडी सेविकेच्या मृत्यूनंतर भावजयीने लाटले मानधन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 8, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील बाबा नगर येथील अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या मदतनीस मेल्यानंतरही सहा महिने पगार देण्यात आला. याबाबत एका आमदाराने मागणी करून ही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सत्ताधारी शिंदेसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी भाजपा आमदार सुरेश धस यांनीही संताप व्यक्त करीत सत्ताधारी आमदारांनी मंत्री आदिती तटकरे यांची कोंडी केल्याचे चित्र दिसले. याप्रकारे दोघाधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.
    शिंदे शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. त्यात त्यांनी सांगितले की, नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्यातील एका अंगणवाडी केंद्रावर 1 सप्टेंबर 1996 मध्ये 50 रुपये मानधनावर पहिली नियुक्ती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना 740 रुपये मानधनावर 28 जून 2006 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने दुसरी नियुक्ती देण्यात आली होती. दरम्यान, अंगणवाडी कर्मचारी शांता जयंतीलाल तडवी या सेवेत असतांना दि.11 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले होते. शांता तडवी यांच्या निधनानंतर बाबानगर अंगणवाडीत बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांनी संगनमत करुन त्यांना मृत न दाखविता त्यांच्या जागी त्यांच्या नावावर दुसऱ्या महिलेला कामावर ठेवून त्या महिलेचा फोटो लावून महिलेच्या बँक खात्यावर मानधन जमा करुन काढुन घेतले. मृत महिलेच्या मृत्यूनंतरही सहा महिन्याचे मानधन देण्यात आले. शांता तडवी हिची भावजय सुमित्रा तडवी हिने अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी मिळविली, त्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. याबाबत जिल्हाधिकारी तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही आमदाराची तक्रारीची दोन महिने झाल्यानंतर ही दखल घेण्यात आली नाही. अखेर त्यांच्याविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला संबंधितांवर कारवाईची मागणी यावेळी आमश्या पाडवी यांनी केली.

    सत्ताधारी आमदारांनी मंत्र्यांना घेरले
    शिंदेसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी भाजपचे हरीश पिंपळे, सुरेश धस आणि स्वत: आमश्या पाडवी यांनी प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षक यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली. नोकरी मिळविली, हा गैरप्रकार होण्यास हे दोन अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करा असे ते म्हणाले. यावेळी सत्ताधारी आमदारांनी मंत्री आदिती तटकरे यांना घेरल्याचे चित्र दिसले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!

    November 17, 2026

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif