Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • ओमानच्या समुद्रात तेलवाहू जहाजावर मोठा हल्ला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये
    कृषी

    कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये

    पावती बघताच शेतकरी रडला : कांद्याला भाव किलोला ५० पैसे
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 10, 2026No Comments145 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील एका शेतकऱ्याला कांद्याच्या घसरलेल्या दराचा मोठा फटका बसला असून, ७३ पोती कांदा विकल्यानंतर सर्व खर्च वजा जाता त्यांच्या हातात केवळ ४०० रुपये उरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा तालुक्यातील पांगरे येथील शेतकरी अंकुश अण्णा गुंजाळ यांनी आपल्या शेतात मोठ्या कष्टाने कांद्याचे पीक घेतले होते. २१ एप्रिल २०२६ रोजी त्यांनी आपला ७३ पोती कांदा विक्रीसाठी सोलापूर येथील ‘शरीफ ट्रेडर्स’ या आडत दुकानावर आणला होता. मात्र, बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने त्यांच्या कांद्याला प्रति किलो केवळ ५० पैसे इतका नीचांकी भाव मिळाला. कांदा विक्रीची ‘पट्टी’ हातात आल्यानंतर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले. ७३ पिशव्या कांद्याची एकूण विक्री किंमत ५,०६८ रुपये झाली. मात्र, त्यातून खालील खर्च वजा करण्यात आले.

    वाहतूक भाडे, हमाली व तोलाई,आडत खर्च हे सर्व खर्च वजा जाता, अंकुश गुंजाळ यांना प्रत्यक्षात फक्त ४०० रुपये मिळाले. दिवसभर उन्हात राबून आणि हजारो रुपये खर्च करून पीक घेतल्यानंतर हातात आलेल्या या तुटपुंज्या रकमेमुळे शेती करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

    शेतकऱ्याने रात्रंदिवस कष्ट करून पीक पिकवायचे आणि बाजारात आल्यावर त्याला मातीमोल भाव मिळायचा, हे दुर्दैव आहे. सरकारने तातडीने लक्ष देऊन प्रत्येक पिकाला हमीभाव द्यावा, तरच शेतकरी जगू शकेल. या घटनेमुळे करमाळा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष मदतीची मागणी जोर धरत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif