काठेवाडी कुटुंब चाळीस वर्षानंतर झाले स्थायिक रहिवाशी
मुलांना लागली शाळेची गोडी शाषकीय सुविधा मिळण्याची प्रतिक्षा : महिला झाल्या मुख्यमत्रीच्या लाडक्या बहिणी
मनवेल ता. यावल
गेल्या चाळीस वर्षापासुन पाच महिने मानकी शिवार व सात महिने शेतात राहुन रहिवास करीत असलेले काठेवाडी कुटुंब दगडी गावात स्थायिक झाले आहे. गुजरात मधील मुळ रहिवाशी असलेले (गुराखी) काठेवाडी गाय, म्हैसी व बकऱ्या घेवून गेल्या चाळीस वर्षापासून मनवेल परिसरात आले असून पाच महिने मानकी शिवारात वास्तव्य करतात. तर सात महिने जंगलाल शेतकऱ्याचा शेतात बसुन उदरनिर्वाह करीत होते. मात्र त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची शाषकीय दस्ताऐवज सल्यामुळे शासनाच्या विविध योजने पासुन वंचित राहात असल्यामुळे ते आता गावाजवळ राहून शाषकीय योजनेचा लाभ मिळवून घेण्यासाठी कासावीस झाले आहे.
१५ छोटे कुटूंब असलेल्या काठेवाडी कुटुंबातील काही तरुणांनी शिक्षणासाठी मुलांना शाळेत पाठविणे, महिलांना दवाखाऱ्यात प्रसूती साठी दाखल करून जन्म दाखले जमा करणे, सर्वांची आधार कार्ड काढून पॅन कार्ड तयार करणे, रेशन कार्ड, मतदान कार्डे असे कागदपत्रे जमा करीत त्याना गावाकडील गोडी निर्माण झाली असुन ते दगडी गावात स्थानिक रहिवाशी सारखे राहु लागले आहे.
0 ते ६ वयोगटातील मुल आता अंगणवाडी व जि. प. मराठी शाळेत जावून शिक्षण घेवू लागले आहे, तर महिलांना प्रथमच मुख्यमत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाल्याने त्याच्या चेहरा फुलला आहे. गेल्या चाळीस वर्षापासून वणवण फिरणाऱ्या काठेवाडी कुटूंब यांना गावात स्थायिक झाले असून विविध प्रकारच्या शाषकीय योजनाच्या लाभ कसा प्रकारे मिळेल यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.