नोटा मोजून घाम निघाला मात्र नोटा काही संपेना…

0

 

पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क;

बिहारच्या ग्रामीण बांधकाम विभागात तैनात असलेल्या कार्यकारी अभियंत्याच्या घरातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली. किशनगंज आणि पटना इथला कार्यकारी अभियंता संजय कुमार राय यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी घरातून सुमारे 5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. नोटांची मोजणी सुरू आहे. अधिकाऱ्यांना नोटा मोजेपर्यंत घाम निघाला मात्र त्या काही संपेना अशी अवस्था झाली होती.

जमिनीची कागदपत्रे आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. सकाळी साडेदहा वाजल्यापासून छापेमारी सुरू आहे. याशिवाय किशनगंजमध्येही छापे टाकण्यात आले. याशिवाय बँकेतील व्यवहारांची देखील चौकशी केली जात आहे.

संजय राय यांच्याकडे अवैध संपत्ती असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर ही छापेमारी करण्यात आली. या धाडसत्रामध्ये इंजिनियरच्या संपर्कात असलेल्या लोकांची देखील चौकशी आणि त्यांच्या घराची झडती घेण्याचं काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.