जळगावात अ‍ॅड. सुशील अत्रेंच्या घरावर दगडफेक

10 ते 12 जण ताब्यात

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगावातील अ‍ॅड.सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रतापनगर येथील श्री स्वामी समर्थ दिवशी केंद्राचे अतिक्रमण हटवण्यास विरोध करत तरुणांनी दगडफेक केली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी 10 ते 12 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील प्रताप नगर परिसरात असलेल्या एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण असण्याच्या कारणावरून गेल्या अनेक वर्षांपासून तक्रार आहे. हे अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आल्याने ते काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यावरून काही जण संतप्त झाले त्यामुळे शुक्रवार, 18 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास मोठा जमाव प्रताप नगर परिसरातील धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जमला व अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविण्यात आला.

त्यानंतर जमावाने धार्मिक स्थळापासून जवळच असलेल्या अ‍ॅड.सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेथून 10 ते 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.