प्रशासनच्या लेखी अश्वासनानंतर राख कामगारांचे आंदोलन स्थगीत…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

भुसावळ तालुक्यतील विल्हाळे बंडातील राख उचण्यासाठी विज केंद्राने ई निवेदा कढून स्थानिक व परिसरातील मजुरांना बेरोजगार करण्यात घाट विज कंपनीने घातला होता, त्याच्या विरोधात केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर शेकडो मजुरांनी आंदोलन केले होते. मात्र प्रशासनाच्या लेखी अश्वासनानंतर आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले आहे.

तालुक्यातील दिपनगर औष्णीक विज केंद्रातून विल्हाळे बंडात पडणारी राख पुर्वी पासुनच मोफत उचल केली जाते व त्याठिकाणी स्थानीकांसह परिसरातील शेकडो मजुर काम करत होते. मात्र, विज केंद्राने सदर राख उचण्याकामी ई निवेदा काढून मजुरांना बेरोजगार करण्याचा प्रयत्न होत असल्याने विल्हाळे ग्रामपंचायत सह परिसरातील वीस ग्रामपंचायतीने ठराव करून निवेदा रद्द करण्यासाठी मजुराच्या बाजूने उभे राहून सदर निवेदा रद्द करण्याची मागणी विज प्रशासनाला ई निवेदन देऊन मागील आठवड्यात मागणी केली होती. परंतु विज प्रशासन मागणी कडे लक्ष देत नसल्याने लोक संघर्ष मोर्चा व विविध राजकिय पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी विज केंद्रावर शेकडो मजुरांच्या उपस्थीतीत आंदोलन करून ई निवेदा रद्द करण्याची मागणी केली.
या दरम्यान प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी विज केंद्राचे मुख्य अभियंता मोहन अव्हाड हे आदोलनकर्त्यांना सामोरे जात हि ई निवेदा दिपनगर विज केंद्रा कडून नव्हे तर मुख्यालयात काढण्यात आली असून सदर मागणीने निवेदन मुख्यालयात वरिष्ठांना सादर करण्यात येणार असल्याचे सांगत आंदोलन मागे घेण्यास सांगीतले. या आंदोलनात लोक संघर्ष समितीचे चंद्रकात चौधरी, प्रकाश सरदार, समाधान चौधरी, दिपक मराठे, गोलु राणे, नागो पाटील, बाळु तायडे, मिलिद सुरवाडे, हेमंत पाटील, सतिष पैहलवान, पुरुषोत्तम पाटील, विजु पाटील यांचेसह शेकडो गावकरी तसेच मजूर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.