Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»आदित्य ठाकरे ‘ईव्हीएम’वर निवडून आलेत; त्यांनी आधी राजीनामा द्यावा!
    राजकारण

    आदित्य ठाकरे ‘ईव्हीएम’वर निवडून आलेत; त्यांनी आधी राजीनामा द्यावा!

    मुंबईतील मोर्चा ही कोल्हाकुई : आशिष शेलार यांची बोचरी टीका
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 4, 2026Updated:October 4, 2026No Comments53 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    “राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी कधीच जनतेमध्ये जाऊन निवडणूक लढवलेली नाही. आपला पराभव लपवता येत नाही, म्हणून अत्यंत बेछूट आरोप केले जात आहेत. आदित्य ठाकरे हेही ईव्हीएमवरच निवडून आले आहेत. ते हुकूमशाहीतून निवडून आले आहेत का,” असा सवाल करत निवडणूक प्रक्रियेवर आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांचा राजीनामा घ्यावा, आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान भाजप नेते मंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. आजचा मुंबईतील गर्जना मोर्चा नसून कोल्हाकुई मोर्चा होता, अशी बोचरी टीकाही त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

    आशिष शेलार म्हणाले की, आज राज ठाकरे ईव्हीएमला विरोध करत आहेत. मात्र २००९ विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे १३ आमदार हे ईव्हीएमवर मतदान होऊनच निवडून आले होते. ‘मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम’ (एसआयआर) हा मतदारयादी अधिक पारदर्शक होण्यासाठीचा कार्यक्रम आहे, असे स्पष्ट करत निवडणुकीत पराभूत झालेल्या रडक्यांचा हा मोर्चा आहे. मुंबईतील ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा नसून कोल्हाकुई मोर्चा होता, अशी बोचरी टीकाही शेलार यांनी केली.

    भारतीय जनता पक्षाला प्रशासन चालवता येत नाही, ज्ञानेश कुमारांची नेमणूक पक्षपातीपणे केली, असे बेछूट आरोप आपला पराभव लपवता न येणारे करत आहेत. मात्र आम्ही जनतेचे काम करतो. आता ठाकरे बंधूंना राजकारणात कसे काम करावे याच्या टिप्स हव्या असतील तर आम्ही देऊ, असा टोलाही शेलार यांनी लगावला.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif