Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»आदित्य ठाकरे ‘मंत्रिपद’ सोडणार?
    महाराष्ट्र

    आदित्य ठाकरे ‘मंत्रिपद’ सोडणार?

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 22, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून एक मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणाऱ्या एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरू असतानाच हे वृत्त आलं आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांबरोबर असलेले एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आणि याच सगळ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइवरून मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे.
    दरम्यान, सुरतमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर एकनाथ शिंदे भल्या पहाटेच 33 आमदारांना घेऊन गुवाहाटीला तळ ठोकून आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आणखी आमदार येणार असा दावा केला होता. त्यांचा हा दावा आता खरा ठरला आहे. गुवाहाटी विमानतळावर आणखी एक सेनेचा आमदार एकनाथ शिंदेंचा तंबूत पोहोचला आहे. आमदार योगेश रामदास कदम हे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहे. गुहाहटी विमानतळावर भाजपा आणि सेनेचे काही जण योगेश कदम यांना घेण्यासाठी थांबलेले आहे. तर त्यांच्यासोबत संजय राठोड हे सुद्धा पोहोचले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा गटाची ताकद आणखी वाढली आहे.
    विशेष म्हणजे, अनिल परब यांच्याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्यांना रसद पुरवण्याचा आरोप रामदास कदम यांच्यावर झाला होता. त्यानंतर रामदास कदम हे विधान परिषदेतून निवृत्त झाले होते. पण, सेनेनं त्यांना संधी दिली नाही. योगेश कदम यांनाही पक्षाने डावललं होतं. अधूनमधून योगेश कदम हे शिवसेनेला घरचा अहेर देत होते. आता योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले आहे.
    दरम्यान,’आम्ही 40 आमदार सोबत आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आहे, ते पुढे घेऊन जाणार आहोत. सत्तेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. सर्वसामान्य जनतेची जी भावना आहे, ती घेऊन पुढे जात आहोत’ असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही सर्व सामान्य शिवसैनिक आहोत. आम्ही कुणावरही टिका करणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार सोबत आले आहे. कुणाबद्दलही काही बोललो नाही. विकासाचं राजकारण केलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif